ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - श्रीवर्धन

लोकसभेच्या आखाड्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलीये. मात्र तटकरे यांचा हक्काचा मतदारसंघ म्हणजे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ. श्रीवर्धन... अथांग समुद्र किनाऱ्याचं दर्शन घेण्यासाठी पर्यटक आवडीने जेथे येतात. 

Updated: Oct 8, 2014, 04:51 PM IST
 title=

रायगड : लोकसभेच्या आखाड्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलीये. मात्र तटकरे यांचा हक्काचा मतदारसंघ म्हणजे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ. श्रीवर्धन... अथांग समुद्र किनाऱ्याचं दर्शन घेण्यासाठी पर्यटक आवडीने जेथे येतात. 

एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून श्रीवर्धनची ओळख आहे. रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला हा विधानसभा मतदारसंघात आहे. रायगडमधील रोहा, माणगाव, तळा, म्हसळा आणि श्रीवर्धन यांचा मिळून श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ तयार झालाय. पूर्वी काँग्रेस, नंतर शिवसेने आणि आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची राजकीय ओळख बनलीय.

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार - 

शिवसेना - रवी मुंडे
भाजप - कृष्णा कोबनाक
काँग्रेस - उदय कटे
राष्ट्रवादी - अवधूत तटकरे
अपक्ष - अस्लम इब्राहीम राऊत (शेकाप

२००९ च्या निवडणुकीत सुनील तटकरे यांनी ६६ हजार १४१ मतं घेतं विजय़ मिळवला होता. शिवसेनेच्या तुकाराम सुर्वे यांना ५५ हजार २७० मत मिळाली होती. या निवडणुकीत १०,८४१ मतांचे मताधिक्य तटकरे यांना मिळालं होतं.

आमदारकी, मंत्रीपद, प्रदेशाध्यक्षपद अशी विविध पदे  सुनील तटकरे यांनी भूषवली...आणि त्यामाध्यमातून  श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलल्याचा दावा तटकरेंनी केलाय.

आमदारांची विकासकामे
- श्रीवर्धन बीच सुधारणा करण्याचे महत्वाचे काम करण्यात आले आहे . 
- गेली अनेक वर्ष रखडलेला माणगाव ते श्रीवर्धन आणि लोणेरे -गोरेगाव मार्गे श्रीवर्धन या राज्य मार्गाचे रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.
- दिघी पोर्ट प्रकल्प उभारणीला सुरुवात 
- माच्छीमारांना रोजगाराची संधी
- श्रीवर्धन शहरात आयटीआय इमारत, महिला महाविद्यालय , उपजिल्हा रुग्णालय, नगर पालिकेचे प्रशासकीय नूतन इमारतीचे बांधकाम असे विविध विकासकामे मार्गी लावल्याचा दावा तटकरेंनी केला आहे.

या विकास कामांवरच जनता पुन्हा एकदा सुनिल तटकरेंना संधी देईल असा राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांना विश्वास आह. सुनील तटकरे यांच्याकडून विकास केल्याचा दावा केला असला तरी  विरोधकांना तो  मान्य नाही. सुनील तटकरेंच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात आजही अनेक समस्या जैसे थे आहेत.
- श्रीवर्धन शहरात शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्या कायम आहे .
- ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची गैर सोय 
- दिघी पोर्टमध्ये स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न
- ग्रामीण भागतील रस्त्यांची दुरवस्था
- वर्सद वावे साखरी आणि बाणगंगा धरण प्रश्न प्रलंबीत
- दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून पायाभूत सुविधेचा प्रश्न 

या निवडणूकीत पुन्हा राष्ट्रवादी विरुद्ध सेना असा सामना पाहायला मिळणार असल्याचे राजकिय विश्लेषकांच म्हणणं आहे.

सुनील तटकरे विधान परिषदेवर निवडून गेल्याने आत्ता तटकरे यांचा वारसदार कोण? राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असणार यावरही श्रीवर्धन मतदारसंघातीचं गणितं अवलंबून असणार आहे. तसेच राष्ट्रवादी आणि सेनेत राजकीय लढाई पहायला मिळणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.