रायगड : शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा गेली पंचवीस वर्ष इथे फडकत आहे. दोन-तीन अपवाद वगळले तर या मतदार संघातून शेकापचा उमेदवार सातत्याने विजयी होत आहे. त्यामुळे विरोधक कोण असणार यापेक्षा शेकापचा उमेदवार यावेळी कोण असणार याचीच चर्चा अधिक आहे.
विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार -
शिवसेना - महेंद्र दळवी
भाजप - राजू सोळंके / प्रकाश काठे
काँग्रेस - मधुकर ठाकूर
राष्ट्रवादी - महेश मोहिते
अपक्ष - पंडित पाटील (शेकाप)
निसर्गरम्य आणि पर्यटकांचा सतत राबता असलेला अलिबाग विधानसभा मतदार संघ. अलिबाग आणि मुरुड या दोन तालुक्यांचा मिळून हा विधानसभा मतदार संघ बनला आहे.
या मतदारसंघातील मतदारांची संख्या २ लाखांहून अधिक आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी - काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांना या विधानसभा मतदारसंघातून तब्बल २० हजारांची आघाडी मिळाली होती.
शेकापच्या मीनाक्षी पाटील या अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्य़ा विद्यमान आमदार आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मधुकर ठाकूर यांचा पराभव करून मीनाक्षी पाटील यांनी विजय मिळवला होता.
मात्र २००४ मध्ये मिनाक्षी पाटील यांना पराभव पत्करावा लागला होता. कारण, त्यावेळी विरोधकांनी एकत्रितपणे निवडणूक लढली होती. मिनाक्षी पाटील यांनी या आमदारकीच्या कार्यकाळात अनेक विकास कामे केल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.
आमदार मीनाक्षी पाटील यांच्याकडून जो विकास कामे केल्याचा दावा केला जातोय त्यावर विरोधांनी अक्षेप घेतलाय. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात दावेप्रतिदावे केले जात असले तरी अलिबाग विधानसभा मतदारसंघातील हे वास्तव आहे.
- अलिबाग - पेण राज्य मार्गाचे चौपदरी रखडले
- ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची गैरसोय
- कृषी आणि सागरी पर्यटनाकडं दुर्लक्ष
- मुंबई ते अलिबाग दरम्यान बारमाही जल वाहतूक सुरु
- मुरुड - अलिबाग रस्त्याचे रुंदीकरण
- खार जमिनींचा प्रश्न प्रलंबित
असे अनेक प्रश्न आजही सुटले नाहीत.
या विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पहाता दोन्ही काँग्रेसचं मनोमिलन पहायला मिळतंय.
तसेच यावेळी शेकाप उमेदवारा विरोधात काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या प्रमाणेच शिवसेनेच्या उमेदवाराचे आव्हान असणार आहे. विरोधकांनीही कंबर कसली असून आगामी विधानसभेत रंगतदार सामना पहायला मिळणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.