हैदराबादः कट्टर 'एमआयएम' संघटनेच्या रुपाने महाराष्ट्रात कडवा मुस्लिमवादाचा चंचू प्रवेश झाला आहे. औरंगाबाद आणि भायखळा येथे मुस्लीम जनतेने येथील दोन उमेदवारांना निवडून विधानसभेवर पाठविले आहे. औरंगाबाद पूर्व, पश्चिम, मालेगाव, परभणी, आणि सोलापूरसारख्या मतदारसंघात त्याचे उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळविले आहे.
हैदराबादमधील 'मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन' या संघटनेची स्थापना कासीम रझवीने केली आहे. या संघटनेचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दोन आमदार विधानसभेत पाठवून शिरकाव केला आहे. या संघटनेचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी याने राज्यात 24 उमेदवार उभे केले होते.
'15 मिनट के लिए पुलीस हटा दो फिर बीस करोड मुसलमान और सौ करोड हिंदूओंमे कौन भारी पडेगा देखते है' असे ओवेसी बंधूंच्या विषारी प्रचारामुळे मुस्लिमांनी एमआयएमचे दोन उमेदवार महाराष्ट्र विधानसभेत पाठविले. औरंगाबाद मध्य मतदारसंघामध्ये इम्तियाज जलील यांनी 61 हजार 843 मते घेतली तर भायखळा मतदारसंघात पठाण वारिम युसूफ यांना 25 हजार 314 मते मिळाली.
काँग्रेस - राष्ट्रवादीची व्होट बँक
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा मुसलमान समाज आपली व्होट बँक असल्याचा गैरसमज होता. हा गैरसमज या निवडणुकीत नक्की दूर झाला असेल. यामुळे दोन्ही पक्ष्यांना जबरदस्त झटका बसला आहे.
औरंगाबादमध्ये चंचूप्रवेश
एमआयएम याने औरंगाबादमध्ये चांगले हातपाय पसरले आहे. औरंगाबादमध्ये 61 हजार 843, पूर्वमध्ये 60 हजार 268 तर पश्चिममध्ये 35 हजार 348 मते एमआयएमला मिळाली आहे. हिंदूविरोधी राजकारण करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीचा पायाच मुस्लिमांनी खिळखिळा करून टाकला आहे.
उमेदवार | मतदारसंघ | मिळालेली मते |
सय्यद इम्तियाज जलील (विजयी) | औरंगाबाद मध्य | 61,843 |
पठाण वारिम युसुफ (विजयी) | भायखळा | 25,314 |
डॉ. गफ्फार कादरी | औरंगाबाद पूर्व | 60, 268 |
गंगाधर गाडे | औरंगाबाद पश्चिम | 35348 |
अब्दुल हबीब अब्दुल करीम | नांदेड उत्तर | 32, 333 |
सय्यद मोईन | नांदेड दक्षिण | 34, 450 |
सय्यद खालीद सय्यद साहेबजान | परभणी | 45, 058 |
शेख तौफिक इस्माइल | सोलापूर मध्य | 36,000 |
अब्दुल मलीक महंमद युनूस | मालेगाव | 21,050 |
शेख मुहम्मद रजा | सायन कोळीवाडा | 5,896 |
अश्रफ मुलाणी | मुंब्रा कळवा | 14, 712 |
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.