पवारांची ही गुगली चालणार नाही – संजय राऊत

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन सरकार बनवावे, असा काँग्रेसने प्रस्ताव दिला दिल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर ही अफवा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

Updated: Oct 20, 2014, 07:00 PM IST
पवारांची ही गुगली चालणार नाही – संजय राऊत title=

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन सरकार बनवावे, असा काँग्रेसने प्रस्ताव दिला दिल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर ही अफवा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

अशा प्रकारच्या अफवा मुद्दाम पसरविल्या जातात आणि महाराष्ट्रात राजकीय वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये. जे अशा अफवा पसरवतात, त्यांच्यावर पवारांनी कारवाई करावी.

काँग्रेसकडून प्रस्ताव होता की शिवसेनेला पाठिंबा द्यायचा मग राष्ट्रवादीने तात्काळ भाजपला पाठिंबा का दिला. घाई घाईने न मागता. जो तो आपली मर्यादीत ताकद आहे, ती दाखवून प्रकाशात राहण्याचा प्रयत्न करीत आहे. यात दाखवून दिले जाते की आम्हीही कोणी तरी आहोत. लक्ष आमच्याकडेही असू द्या. सत्ता स्थापन होत नाही तोपर्यंत हे छोटे भीडू आहे ना, बॉल घेवून पँटला घासत असतात. त्यांनी किती जरी घासला बॉल तरी त्यांना गुगली टाकता येणार नाही.

भाजपला पाठींबा देण्याबाबत पवारांनी स्पष्टीकरण दिलं होत. तसंच शिवसेनेला पाठिंबा देण्याचा काँग्रेसचा इरादा होता असा गौप्यस्फोटही पवारांनी केला. मात्र पवारांचा हा दावा माणिकराव ठाकरेंनी फेटाळलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.