मुंबई : केंद्रीय गृह मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह हे रविवारी महत्वाची बैठक घेण्यासाठी मुंबईत येणार होते, मात्र मध्येच राजनाथ सिंह यांनी आपला दौरा रद्द केला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघाकडून मुख्यमंत्रीपदासाठी नितिन गडकरी यांचं नाव सुचवण्यात आलं आहे. या निर्णयानंतर राजनाथ सिंह यांचा दौरा स्थगित करण्यात आला आहे.
भाजप नेते विनोद तावडे यांनी म्हटलं आहे की, नव्या तारखेची घोषणा नंतर केली जाणार आहे. नवनियुक्त आमदार सोमवारी दुपारी भाजप प्रदेश कार्यालयात भेटणार आहेत, विजयाचा आनंदोत्सव साजरा करणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.