नारायण गाव : राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षातील कोणते आमदार गळाला लागतात याची चाचपणी सुरु झाली आहे. याचाच एकभाग म्हणून मनसेचा एकच आमदार निवडून आला. या आमदाराला गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपकडून केला गेला. मात्र, आपण पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश मानणार आहोत. मी मनसेत राहणार असल्याचे मनसे आमदार शरद सोनावणे यांनी स्पष्ट केलेय.
आपल्याला भाजपचे नेते भेटायला आले होते. पण राज यांचाच आदेश मानणार, असे आमदार सोनावणे म्हणालेत. आज मंगळवारी राज ठाकरे यांची भेट घेणार आहोत आणि ते सांगतील त्यानुसार निर्णय घेणार आहे, असे सोनावणे यांनी म्हटलेय.
भाजपकडून अपक्ष आमदार आणि कमी संख्येने निवडून आलेल्या अन्य पक्षांच्या आमदारांशी संपर्क साधण्यात येत असल्याचे सोमवारी वृत्त होते. याबाबत सोनावणे यांनी म्हटलेय, आपण मनसेच्या इंजिन चिन्हावर निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे भाजपसोबत जायचे का, याबाबत राज ठाकरे हेच निर्णय घेतील. आपण राज यांना भाजपचे नेते भेटल्याचे सांगणार आहे, असे सोनवणे यांनी स्पष्ट केलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.