बाळासाहेब असते तर भाजपला कधीच लाथाडलं असतं - राज ठाकरे

भाजप आणि सेनेवर यथेच्छ तोंडसुख घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजपासून आपल्या प्रचार सभेला सुरूवात केली. 

Updated: Sep 28, 2014, 09:02 PM IST
बाळासाहेब असते तर भाजपला कधीच लाथाडलं असतं - राज ठाकरे  title=

मुंबई : शिवसेनेला भाजपने एक महिना लाचारीने ठेवले होते. शिवसेनेला माहिती होते की भाजपला युती कारायची नाही. शिवसेनेने एक महिन्यापूर्वीच लाथ मारायला हवी होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर गद्दारी करणाऱ्या भाजपला लाथ मारली असती, असा जोरदार टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना-भाजपतील भांडणावर बोलताना लगावला. 

कशाला नाटकं करतात महापालिकेत युती, केंद्रात मंत्रीपद तुम्हांला जर येवढ वाटत असतं तर महापालिकेतील युती तोडली असती आणि केंद्राच्या मंत्रीपदाला लाथ मारली असती, निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येतील कोणास ठाऊक, मग ही नाटक कशाला असा प्रश्न राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. 

गेल्या पंधरा दिवसापासून हे काय चाललं होते. रतन खत्रीचे आकडे लागतात, तसा आकडे सुरू होते. राजकारणाचा तमाशा लावून ठेवला होता. वेश्याबाजारापेक्षाही वाईट प्रकार सुरू होता, असेही ते म्हणाले. 
भाजपचा समाचार घेताना राज म्हणाले,  भाजपचा काय भरवसा, लोकसभेच्या वेळी मी चांगुलपणाने  वागलो होतो, कोणाशी चांगुलपणे वागले म्हणजे त्यांनी वागले पाहिजे, असं नसतं, असाही खोचक टोला लगावला. 

रामदास आठवलेंना घरचे हसले असतील  
रामदास कदम यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर शिवसेनेने दिली त्यावर कोटी करताना राज ठाकरे म्हणाले, या रामदास आठवलेंना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, ही ऑफर ऐकल्यावर रामदास आठवलेंच्या घरचेही हसले असतील. बेशुद्ध पडले नाही, हे नशीब. ज्या माणसाला स्वत:च्या पक्षाचे चिन्ह मिळाले नाही, त्याला उपमुख्यमंत्रीपद असे म्हणून राज ठाकरे यांनी रामदास आठवलेंची खिल्ली उडवली. 

भाजप आणि सेनेवर यथेच्छ तोंडसुख घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजपासून आपल्या प्रचार सभेला सुरूवात केली. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कांदिवलीत प्रचार सभा घेऊन आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. पाहू या काय मुद्दे मांडले त्यांनी आपल्या प्रचार सभेत...  

राज ठाकरेंच्या पहिल्या सभेतील ठळक मुद्दे 

*  मनसेच्या प्रचाराचा कांदिवलीतून नारळ फुटला

*  राजकारणाचा तमाशा लावून ठेवला.... वेश्या बाजार सारखा बाजार मांडून ठेवला आहे. - राज ठाकरे

*  आयाराम गयारामवर राज ठाकरे यांचे वक्तव्य...

| गेल्या १५ दिवसापासून आजारी होतो. वाफ घेत होतो. हे इंजिन वाफेवर होतो...

*  भाजपचा काय भरवसा, कोणाशी चांगुलपणे वागले, त्यांच्याशी चांगुलपणाने वागलो म्हणजे त्यांनी वागले पाहिजे - राज ठाकरे

*  अतुल भातखळकरांनी मनसेचे तिकीट मागितलं होतं, भैय्याना उत्तर मुंबई दिली आहे - राज ठाकरे

*  माझा आमदार तुम्ही पळवता, लाजा वाटत नाही, भाजपला टोला - राज ठाकरे

*  शिवसेनेला युती करायची नव्हती, शिवसेनेला लाचारीने ठेवले भाजपने - राज ठाकरे

*  एक महिन्यापूर्वी शिवसेनेने लाथ मारायला हवी होती - राज ठाकरे

*  युतीशी मला घेणे देणे नाही, राजकारणाचा विचका केला आहे - राज ठाकरे

*  बाळासाहेब असते तर मित्रपक्षांना लाथ मारली असती - राज ठाकरे

*  अशा लोकांच्या जीवावर महाराष्ट्राचे भविष्य तुम्ही देणार आहे का - राज ठाकरे

*  रामदास आठवलेंना उपमुख्यमंत्री देतो, त्यांचे घरचोही हसले असतील - राज ठाकरे

*  युतीच्या राजकारणात, १५ वर्षे महाराष्ट्र मागे गेला आहे - राज ठाकरे

*  गेल्या पंधरा दिवसांपासून विकासावर कोणी बोलत नाही - राज ठाकरे

*  सरकार आले तर खासगी सिक्युरिटी बंद करेल सरकारी सेक्युरिटी एजन्सी स्थापन करेल... राज ठाकरे

*  धारावी छोटी झोपडपट्टी छोटी झाली, त्याच्या आसपास मोठ्या झोपडपट्ट्या झाल्या आहेत.

*  माझ्या सत्तेचा पहिला दिवस, हा महाराष्ट्रातील झोपडपट्ट्यांचा शेवटचा दिवस - राज ठाकरे

*  घर जर महिलेच्या नावावर झाले, घराचे इतर कर लागणार नाही - राज ठाकरे

*  परवडणारे घर सामान्यांना का मिळत नाही, माझं सरकार आले तर परवडणारे घर मिळेल - राज ठाकरे

*  महाराष्ट्र सर्व कॉन्ट्रॅक्टर चालवतात, मंत्री फक्त मुंड्या हलवायला आहेत - राज ठाकरे

*  एकदा माझ्या हातात सत्ता द्या, मी वेगळा महाराष्ट्र घडवून दाखवेन - राज ठाकरे

*  सर्व राष्ट्रीय बाजुला सारा आम्हीी माझ्या हातात सत्ता द्या - राज ठाकरे

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.