'सत्तेत सहभागी होण्याची आम्हाला घाई नाही' - उद्धव ठाकरे

युती करण्याची शिवसेननेला घाई नसून भाजपाला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत स्पष्ट होईल, असं सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये केलं आहे.  

Updated: Nov 2, 2014, 02:43 PM IST
'सत्तेत सहभागी होण्याची आम्हाला घाई नाही' - उद्धव ठाकरे title=

कोल्हापूर: युती करण्याची शिवसेननेला घाई नसून भाजपाला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत स्पष्ट होईल, असं सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये केलं आहे.  

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी कोल्हापूरमध्ये आले होते. 
यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

टोलविरोधी आंदोलनाची सुरुवात कोल्हापूरमधून झाल्यानं राज्यातील नवीन सरकारनं कोल्हापूरला टोलमुक्त करावं अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली. 

केंद्र सरकारनं बेळगावचं बेळगावी असं नामकरण करण्यास हिरवा कंदील दाखवला होता. यावर उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. बेळगावला केंद्रशासीत प्रदेश म्हणून जाहीर करावं अशी मागणीही त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.