नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी आचारसंहिता भंगचा गुन्हा केला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
मनसेच्या नाशिकमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी शनिवारी जाहीर सभा घेतल्या. त्यातील एक सभा रात्री १० नंतर सुरु होती, असा ठपका ठेवून राज ठाकरे यांच्यावर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक पश्चिमचे उमेदवार नितीन भोसले यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभेत ठाकरेंनी आर. आर. पाटील आणि राष्ट्रवादीवर टीका केली. राष्ट्रवादीला मनसेची भीती वाटत असून सत्तेची भीती दाखवून मनसेला दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ठाकरेंनी यावेली केला.
खाडे आणि त्यांच्या पत्नीवर खोटे गुन्हे आर आर यांनी दाखल केल्याचे सांगत माजी गृहमंत्री सारखा मोठा नेता, बलात्काराच्या प्रकरणात विनोद कसा करतो, असा सवाल त्यांनी केला आहे. यावेळी राष्ट्रवादीला गाडा असे आवाहन राज यांनी मतदारांना केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.