मोदी उपस्थित असलेल्या कार्यक्रमाला उद्धव अनुपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईतल्या रिलायन्स फाऊंडेशनच्या हॉस्पिटलचं उदघाटन झालं. नव्वद वर्ष जुन्या असलेल्या हॉस्पिटलची रिलायन्सकडून नव्यानं उभारणी करण्यात आली. 

Updated: Oct 26, 2014, 04:02 PM IST
मोदी उपस्थित असलेल्या कार्यक्रमाला उद्धव अनुपस्थित title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईतल्या रिलायन्स फाऊंडेशनच्या हॉस्पिटलचं उदघाटन झालं. नव्वद वर्ष जुन्या असलेल्या हॉस्पिटलची रिलायन्सकडून नव्यानं उभारणी करण्यात आली. 

या कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षप्रमुखउद्धव ठाकरे यांनाही आमंत्रण होतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळं नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंची भेट होऊ शकली नाही. 

या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, कला क्रीडा आणि बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.