शिवसेनेचं हे गीत होतंय व्हायरल

शिवसेनेचं शिवसेना गीत हे राजकीय पक्षांमध्ये यू-ट्यूबवर सर्वाधिक लोकप्रिय गाणं ठरलंय, शिवसेनेवर नंतर अनेक गाणी आली. पण, हे गाणं शिवसैनिकांच्या मनात कायम असल्याचं दिसून येतंय. 

Updated: Oct 10, 2014, 06:29 PM IST
शिवसेनेचं हे गीत होतंय व्हायरल title=

मुंबई : शिवसेनेचं शिवसेना गीत हे राजकीय पक्षांमध्ये यू-ट्यूबवर सर्वाधिक लोकप्रिय गाणं ठरलंय, शिवसेनेवर नंतर अनेक गाणी आली. पण, हे गाणं शिवसैनिकांच्या मनात कायम असल्याचं दिसून येतंय. 

या गाण्याचं संगीत शिवसेनेचे सर्वच जाहिरातीच्या शेवटी वापरण्यात येत आहे, हे गाणं कुणी गायलंय, कुणी संगीतबद्ध केलंय या संदर्भात कोणतीही माहिती नसली, तरी हे गीत निवडणूक काळात सर्वात पाहिलं जातं.

शिवसैनिकांमध्येही या गाण्याची क्रेझ आहे, सोशल नेटवर्किंगवर अनेक वेळा हे गाणं व्हायरलं होतं, या गाण्याचं संगीत वापरून अनेकांनी काही नवीन व्हिडीओ देखिल बनवले आहेत.

हे शिवसेना गीत काही वर्षांपूर्वी बनवण्यात आल्याचं दिसतंय, यात वापरण्यात आलेले व्हिडीओ हे फार जुने आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.