'मी शर्यतीत', नाथाभाऊंचा मुख्यमंत्रीपदावर दावा

मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी म्हटलं आहे. सध्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्यांमध्ये देवेंद्र फडणवीस याचं नाव जवळ-जवळ निश्चित झालं असल्याचं सांगितलं जातंय, अशा वेळी एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितल्यानंतर पक्षाची अडचण होण्याची शक्यता आहे.

Updated: Oct 28, 2014, 08:13 PM IST
'मी शर्यतीत', नाथाभाऊंचा मुख्यमंत्रीपदावर दावा title=

मुंबई : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी म्हटलं आहे. सध्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्यांमध्ये देवेंद्र फडणवीस याचं नाव जवळ-जवळ निश्चित झालं असल्याचं सांगितलं जातंय, अशा वेळी एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितल्यानंतर पक्षाची अडचण होण्याची शक्यता आहे.

यावर एकनाथराव खडसे यांनी म्हटलंय, "मी लढवय्या आहे, मी पंधरा वर्षापासून विरोधीपक्ष नेता म्हणून लढतोय. पक्षाच्या एकट्याच्या बळावर पंधरा वर्षानंतर सरकार येतंय, या आनंद आहे. कार्यकर्ता म्हणून मागील ४० वर्षापासून पक्षाच्या निर्णयाचं पालन करत आलो आहे. सन्मान केला आहे. पक्ष स्थापनेच्या आधीपासून या पक्षाच्य़ा विचाराखाली आहे, याचा सन्मान राखला जाईल याची आपल्य़ाला खात्री आहे", असं एकनाथराव खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.