शिवडीत मनसे-शिवसेनेत कडवी झुंज

शिवडी मतदारसंघात शिवसेना आणि मनसेत काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. सेना, मनसे उमेदवारांचा प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. शिवडी मतदारसंघाचा हा लेखाजोखा. 

Updated: Oct 11, 2014, 03:29 PM IST
शिवडीत मनसे-शिवसेनेत कडवी झुंज title=

मुंबई : शिवडी मतदारसंघात शिवसेना आणि मनसेत काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. सेना, मनसे उमेदवारांचा प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. शिवडी मतदारसंघाचा हा लेखाजोखा. 

कामगार आणि मध्यमवर्गीयांची वस्ती असणारा मतदारसंघ म्हणजे शिवडी, या मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या अधिक आहे. यावेळी मनसेचे विद्यमान आमदार बाळा नांदगावकर यांच्यासमोर शिवसेनेचे उमेदवार अजय चौधरी यांचं कडवं आव्हान आहे. शिवसेनेचे विभाग प्रमुख असणा-या अजय चौधरी यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यातच शिवडीमधले सहा नगरसेवक शिवसेनेचे आहेत.

शिवाय, काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ५३ हजाराचं मताधिक्य शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना मिळालं. म्हणूनच शिवसेनेचे उमेदवार अजय चौधरी यांनी आपण मोठ्या फरकाने विजयी होऊ असा दावा केलाय. मनसेचे जायंट किलर म्हणून ओळख असणा-य़ा बाळा नांदगावकर यांचाही प्रचार जोरात सुरु आहे. आपण केलेल्या विकासकामांमुळे आपला विजय होईल, असा त्यांचा दावा आहे.  

भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा फारसा जोर या मतदारसंघात पहायला मिळत नाही. बीडीडी, बीआयटी चाळींचं पुर्नवसन, मोडकळीला आलेल्या इमारतींचा प्रश्न, बीपीटी परिसरात असणा-या प्राथमिक सुविधांचा अभाव, कोळसा बंदरमधून होणारे प्रदूषण यासह अनेक महत्वाचे मुद्दे या मतदारसंघात आहेत. त्यामुळेच हे मुद्दे सोडवण्यासाठी शिवडीकर दोन सेनांपैकी कोणत्या सेनेवर शिक्कामोर्तब करणार हे पाहावं लागेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.