मुंबई : विविध ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून लोकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच पंसती दिल्याचे दिसत आहे. आतापर्यंत विविध वाहिन्यांचे, वृत्तसमुहांचे आणि सर्व्हे करणाऱ्या समुहांचे अंदाज एव्हाना स्पष्ट झालेत. मात्र, यामध्ये उद्धव यांनाच मुख्यमंत्री पदासाठी पसंती मिळाली आहे. तर झी २४ तासच्या महामुख्यमंत्री कोण? यामध्ये ३७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
दोन दिवसांवर मतदान येऊन ठेपले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. असे असताना काहींनी तीन टप्प्यात आपले ओपिनियन पोल घेतलेत. यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनाच लोकांनी पसंती दिसत आहे.
झी २४ तासच्या महामुख्यमंत्री कोणी? या ओपिनियन पोलमध्ये कौल + smsच्या माध्यमातून घेतलेल्या सर्व्हेत उद्धव ठाकरे यांनाच पसंती मिळत आहे. ३७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (३०टक्के), राष्ट्रवादीचे अजित पवार (१७ टक्के), भाजपचे नितीन गडकरी यांना ६ टक्के तर पृथ्वीराज चव्हाण यांना ७ टक्के पसंती मिळाली आहे.
एबीपी माझा-नेल्सन यांनी केलेल्या सर्व्हेत २२ टक्के लोकांनी उद्धव ठाकरे यांना पसंती दिली आहे. तर १९ टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीस, १४ टक्के लोकांनी पृथ्वीराज चव्हाण यांना पसंती दिली आहे. नितीन गडकरींना ९ टक्के, अजित पवारांना ६ टक्के तर राज ठाकरेंना ५ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसतानाही शरद पवारांना ३ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
'सकाळ'ने केलेल्या ताज्या सर्व्हेतही उद्धव ठाकरेंना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. सकाळच्या सर्व्हेत उद्धव ठाकरेंना २२ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर अजित पवार यांना १८ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना १६, देवेंद्र फडणवीसांना १५, पंकजा मुंडेंना ७ टक्के, राज ठाकरेंना ५ टक्के, नितीन गडकरींना४ टक्के तर, अशोक चव्हाणांना ३ टक्के लोकांनी पसंती दिली आहे एकनाथ खडसे, नारायण राणेंना प्रत्येकी २ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
याआधी इंडिया टीव्ही, सी-व्होटर व तालिम आदी विविध संस्थांनी घेतलेल्या सर्व्हेतही भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असे म्हटले आहे तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.