काँग्रेसबाबत 'ते' विधान अनवधानाने - पृथ्वीराज चव्हाण

अनौपचारिक गप्पांमध्ये अनवधानाने केलेल्या विधानाची बातमी करून छापल्याचा खुलासा पृथ्वीराज चव्हाणांनी आता केला आहे.

Updated: Oct 16, 2014, 09:11 PM IST
काँग्रेसबाबत 'ते' विधान अनवधानाने - पृथ्वीराज चव्हाण title=

पुणे : अनौपचारिक गप्पांमध्ये अनवधानाने केलेल्या विधानाची बातमी करून छापल्याचा खुलासा पृथ्वीराज चव्हाणांनी आता केला आहे.

आदर्श प्रकरणी काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी एका इंग्रजी दैनिकाला वादग्रस्त मुलाखत दिली होती. आदर्श प्रकरणी तिघा माजी मुख्यमंत्र्यांवर कारवाई केली असती तर काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला होता, असं वक्तव्य या मुलाखतीत त्यांनी केलं होतं. 

मात्र अनौपचारिक गप्पांमध्ये अनवधानाने केलेल्या विधानाची बातमी करून छापल्याचा खुलासा पृथ्वीराज चव्हाणांनी आता केला. त्याबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केलीय. या वादग्रस्त मुलाखतीवरून काँग्रेसमध्ये खळबळ उडालीय.

पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे १४ ऑक्टोबरला ही मुलाखत दिली होती. टेलिग्राफमध्ये चव्हाणांनी दिलेल्या मुलाखतीमुळे अनेक मोठ्या नेत्यांच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्हं उभं राहिलं होते.
 
आदर्शप्रकरणी विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांना पक्षानं वाचवले. आपण त्यांना तुरुंगात धाडले असते तर राज्यातून पक्षच संपला असता असे विधान पृथ्वीराज चव्हाणांनी केले होते. याबाबत काँग्रेस गोठात संताप व्यक्त होत होता.
 
काहींनी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी थेट हायकमांडकडेच याची तक्रार केली होती. तसेच सोनियांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही केली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.