तर भाजप सरकारला काँग्रेस विरोध करेल - ठाकरे

काँग्रेस आघाडी सरकारनं जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत ते बदलण्याची भूमिका नव्या भाजपच्या सरकारने घेतली तर काँग्रेस विरोध करेल असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी दिलाय. 

Updated: Nov 1, 2014, 08:50 PM IST
तर भाजप सरकारला काँग्रेस विरोध करेल - ठाकरे title=

मुंबई : काँग्रेस आघाडी सरकारनं जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत ते बदलण्याची भूमिका नव्या भाजपच्या सरकारने घेतली तर काँग्रेस विरोध करेल असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी दिलाय. 

पंतप्रधान खर्च कपातीचे आदेश देताच तर दुसरीकडे राज्य सरकार शाही शपथविधीचं आयोजन करतं असा टोलाही माणिकरावांनी लगावला आहे. दरम्यान दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ काँग्रेसने रस्तारोको आंदोलन केले. काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ईस्टन एक्सप्रेसवेवर रस्ता रोकला गेला. यावेळी जाळपोळ करण्यात आली.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार  शपथविधी झाल्याबरोबर कामाला लागले आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर आज पुन्हा नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.