सोशल नेटवर्किंगवर 'ब्लू प्रिन्ट विकणे आहे'

विधानसभा निवडणुकीत मनसेच्या हातात अवघी एक जागा लागल्याने, सोशल मीडियावर मनसेची खिल्ली उडवली जात आहे.ब्लू प्रिन्ट विकणे आहे अशा आशयाचे अनेक मेसेज सध्या फिरतायत. राज ठाकरे यांनी पक्षातील उमेदवार निवडून आणण्यासाठी अनेक जाहीर सभा घेतल्या, सभांनाही खूप प्रतिसाद मिळाला होता. 

Updated: Oct 21, 2014, 11:39 AM IST
सोशल नेटवर्किंगवर 'ब्लू प्रिन्ट विकणे आहे' title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीत मनसेच्या हातात अवघी एक जागा लागल्याने, सोशल मीडियावर मनसेची खिल्ली उडवली जात आहे. ब्लू प्रिन्ट विकणे आहे अशा आशयाचे अनेक मेसेज सध्या फिरतायत.

राज ठाकरे यांनी पक्षातील उमेदवार निवडून आणण्यासाठी अनेक जाहीर सभा घेतल्या, सभांनाही प्रतिसाद मिळाला. मात्र मनसेला मोठं यश मिळू शकलं नाही,

राज ठाकरे यांचे निकटवर्तीय देखिल या निवडणुकीत पराभूत झाले आहेत, शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात मनसेच्या उमेदवारांचा पराभव झाला. 

छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर, त्यांचा पराभव करणारे आणि जाएंट किलर म्हणून नावारूपाला आलेले बाळा नांदगावकर देखिल पराभूत झाले.

राज ठाकरे यांचं यात काय चुकलं?
मनसेची ब्लू प्रिंन्टवरून खिल्ली उडवली जात आहे. राज ठाकरे यांची ही ब्लू प्रिन्ट विकासासाठी आहे, यात अनेक नवे दृष्टीकोन आहेत, याविषयी आजच्या युवा पिढीने माहिती करून घेणे आवश्यक होतं.

राज ठाकरे यांच्या पक्षाचा या निवडणुकीत पराभव झाला आहे, हे स्पष्ट आहे. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात विकासाच्या भूमिकेकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलण्याची तेवढीच गरज आहे. 

कोणता झेंडा घेऊ हाती?
दक्षिण भारतात अनेक प्रादेशिक पक्ष अस्मितेच्या जोरावर राज्य करतात,  त्यांची स्थानिक भाषा, संस्कृती यासाठी ते पक्ष महत्वाची भूमिका बजावतात असं त्यांना वाटतं, मात्र महाराष्ट्रात, त्यातल्या त्यात मुंबई आणि उपनगरात प्रादेशिक आणि मराठी अस्मितेच्या मुद्यावर जोडले गेलेले दोन पक्ष आहेत. त्यामुळे जनतेला निर्णय घ्यायला निश्चितच अवघड होतं. 

शिवसेना-भाजप अशी लढत
मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना-मनसे अशी लढत झाली, यावेळी मात्र शिवसेना-भाजप अशी लढत रंगली, शिवसेनेला अधिक बळ देण्यासाठी मराठी माणूस शिवसेनेमागे उभा राहिला, कारण, भाजपने शिवसेनेशी युती तोडल्याचा तो राग असावा, असंही चर्चा स्थानिक राजकीय नेत्यांमध्ये आहे.

राज ठाकरेंचं टोल आंदोलन
राज ठाकरे यांनी टोल विरोधी आंदोलन पुकारल्यानंतर अनेक शहरात बेकायदेशीरपणे सुरू असलेली टोल वसुली बंद झाली, ही बाब नाकारता येणार नाही, मात्र याचाही फायदा प्रत्यक्षपणे मनसेला झालेला दिसत नाही.

काय असेल मनसेचं भवितव्य?
मनसेचं भवितव्य काय असेल, यावर चर्चा होतांना दिसतेय. मनसेला एक जागा मिळाली असली, तरी राज ठाकरेंसारखा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात नजरेआड करता येईल का? राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली, हे देखिल लपवता येणार नाही. मनसेने मिळवलेल्या मतांची संख्या देखिल यावेळी वाढली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.