मुंबई : ‘चाणक्य’च्या एक्झिट पोलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय. भाजपला नंबर एक, तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरणार आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असतील असा अंदाज आहे. मनसेला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागणार असल्याचं दिसतंय.
भाजप क्रमांक एकचा पक्ष
या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या वाटेला १५१ जागा देण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपला ४६ जागा मिळाल्या होत्या. या जागांमध्ये तब्बल १०५ जागांची वाढ दाखविण्यात आली आहे. त्यामुळे युती तुटल्याचा आणि काँग्रेस राष्ट्रवादीविरोधी लाटेचा फायदा भाजपला झाल्याचं दाखविण्यात आलंय. मोदी फॅक्टर अजूनही कायम असल्याचे या एक्झिट पोलमध्ये दाखविण्यात आलंय.
शिवसेनेला जरासाच फायदा
शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनेल, त्यांना ७१ जागा देण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला ४४ जागा मिळाल्या होत्या. या जागांमध्ये तब्बल २७ जागांची वाढ दाखविण्यात आली आहे. त्यामुळे युती तुटल्याचा फायदा तसेच सरकार विरोधी लाटेचा फायदा शिवसेनेला झाला नसल्याचे दाखविण्यात आले आहे.
राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर
राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यांना २७ जागा देण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला ६२ जागा मिळाल्या होत्या. या जागांमध्ये ३५ जागांचे नुकसान दाखविण्यात आले आहे.
काँग्रेसला दणका
काँग्रेस चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यांना २८ जागा देण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला ८२ जागा मिळाल्या होत्या. या जागांमध्ये तब्बल ५४ जागांचे नुकसान दाखविण्यात आले आहे. सरकार विरोधी लाटेचा फटका सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेसला बसल्याचे दिसते आहे.
राज ठाकरे आणि अपक्षांचा करिष्मा नाही
मनसे आणि अपक्षांचा करिष्मा चालणार नाही असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यांना ११ जागा देण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत मनसेला १३ आणि इतरांना ४१ जागा मिळाल्या होत्या.
पक्ष |
जागा |
भाजप |
१५१ |
शिवसेना |
७१ |
काँग्रेस |
२७ |
राष्ट्रवादी |
२८ |
मनसे |
११ |
एकूण | 288 |
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.