ध्यानधारणा देते सेक्सची प्रेरणा

Updated: Nov 17, 2011, 10:21 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

ध्यानधारणा केल्याने महिलांना लैंगिक जीवनात अधिक आनंद प्राप्त होतो असं एका अभ्यासातुन समोर आलं आहे. ऱ्होड आयलँडवरील ब्राऊन विद्यापीठाच्या संशोधकांनी ४४ विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढला. या ४४ विद्यार्थ्यांपैकी ३० महिला होत्या आणि त्यापैकी १२ जणींनी ध्यानधारणेचा कोर्स केला होता. यात सहभागी झालेल्यांना शृगांरिक प्रतिमांचे स्लाईडशो दाखवण्यात आले आणि त्यांना त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली.

 

स्लाईडशो पाहिल्यानंतर तुम्हाला शांत, उत्साहाने अधाणलेलं किंवा उद्दिप्त झाल्या सारखं वाटला का असं विचारण्यात आलं. ध्यानधारणा करणाऱ्या महिलांना लैगिंक भावना उद्दिप्त झाल्याची प्रतिक्रिया तात्काळ नोंदवली. ध्यानधारणेमुळे महिलांच्या एकाग्रतेत वाढ झाल्याचं तसंच साशंकता किंवा चिंता भेडसावत नसल्याचं आढळून आलं. तसंच ज्या महिलांमध्ये लैंगिक भावना उद्दिप्त झाल्याची प्रतिक्रिया नोंदवण्यास अधिक काळ लागलं त्या स्वताच्या कठोर टीकाकार असल्याचं गिना सिल्वरस्टाईनने असं आघाडीच्या लेखकाने म्हटलं आहे.