सलमान खान छुप्या पद्धतीने 'बाजीराव-मस्तानी'त

संजय लीला भंसाळी यांनी तब्बल १२ वर्ष बाजीराव मस्तानी रिलीज होण्यासाठी वाट पाहिली. या १८ तारखेला तो रिलीज झाला. पण या चित्रपटात छुप्या पद्धतीने सलमान खानही असल्याचे समोर आले आहे. 

Updated: Dec 23, 2015, 07:43 PM IST
सलमान खान छुप्या पद्धतीने 'बाजीराव-मस्तानी'त  title=

 मुंबई : संजय लीला भंसाळी यांनी तब्बल १२ वर्ष बाजीराव मस्तानी रिलीज होण्यासाठी वाट पाहिली. या १८ तारखेला तो रिलीज झाला. पण या चित्रपटात छुप्या पद्धतीने सलमान खानही असल्याचे समोर आले आहे. 
 
 सलमानचा होता संबंध पण... 
 'बाजीराव मस्तानी' याची घोषणा संजय लीला भंसाळी यांनी 'हम दिल दे चुके सनम'नंतर केली होती. यात सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांना घेऊन त्याला हा चित्रपट करायचा होता. पण दोघांचे ब्रेकअप झाले आणि हा चित्रपट बासनात गुंडाळला गेला. 
 
 त्यानंतर सलमान खान याने या चित्रपटासाठी फोटो शूटही केले होते. त्यात करिना कपूर आणि राणी मुखर्जी यांना घेण्याचा विचार भंसाळी यांचा होता. पण ते काही चित्र रंगलं नाही. त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांची नावे बाजीराव-मस्तानी म्हणून फिक्स करण्यात आली. 
 
 सलमानचा आहे संबंध पण... 
 सध्या हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पण यात छुप्या पद्धतीने सलमान असल्याचे समोर आले आहे. यात आभार प्रदर्शन करताना विशेष आभार एसएलबी (SLB) याचे मानण्यात आले आहे. 
 
 चित्रपटाच्या निर्मात्याने या वेळी स्पेशल 'एस' याचे आभार मानले आहे. हा स्पेशल एस दुसरा कोणी नसून भंसाळींचा ओरिजनल बाजीराव - सलमान खान आहे. या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजयने सलमानचे नाव नमूद नाही करणार असं होणार नाही. कारण काही झाले तरी त्याचा खरा बाजीराव तोच होता. 
 
 या संदर्भात संजय लीला भंसाळी जाहीरपणे सांगत नाही पण विशेष आभार हे सलमानचेच मानले असल्याचे सूत्रांनी सांगितले.