सलमानसाठी गाणे म्हणणार यो यो हनी सिंग

 गेल्या काही वर्षात बॉलिवूडवर अधिराज्य करणाऱ्या आणि गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडपासून दूर असलेला गायक यो यो हनी सिंग लवकरच बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. 

Updated: Feb 22, 2016, 08:44 PM IST
सलमानसाठी गाणे म्हणणार यो यो हनी सिंग title=

मुंबई :  गेल्या काही वर्षात बॉलिवूडवर अधिराज्य करणाऱ्या आणि गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडपासून दूर असलेला गायक यो यो हनी सिंग लवकरच बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. 

यो यो हनी सिंग याची नवीन इनिंग त्याचा जुना मित्र शाहरूख खान सोबत नाही तर सलमान खान सोबत करण्रा आहे. शाहरूख आणि यो योमध्ये मतभेद आणि पुन्हा मैत्रीची बातमी आता जुनी झाली आहे.

 

नुकतेच हनी सिंगला झी सिने अवॉर्डमध्ये सर्वांनी पाहिले होते. 

त्यावेळी तो म्हणाला, माझे कोणाशीही भांडण झाले नाही, मी रेस्ट करत होतो, चील करत होतो, बॉडी बनवत होतो. 

गेल्या आठवड्यात सलमान आणि हनी सिंग यांची भेट झाली. त्यावेळी सलमानने वांद्र्यातील आपल्या घरी बोलावले. दुसऱ्या दिवशी सलमानने मित्रांसाठी पार्टी ठेवली होती, त्यावेळी हनी सिंगही गेला होता. 

त्यावेळी सलमानने आपला आगामी चित्रपट सुल्तानसाठी गाणे म्हणण्याचा प्रस्ताव ठेवला. हनी नकार कसा देणार... तर आता सलमानला हनी सिंगच्या गाण्यावर डान्स करताना तुम्ही पाहू शकणार आहे.