“होय मी स्त्री आहे, मला स्तन आहेत” – दीपिका चिडली

सार्वजनिक जीवनामध्ये अतिशय शांत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आज अतिशय चिडलेली दिसली. देशातील एका नामवंत वृत्तपत्रानं दिलेल्या एका बातमीनं आणि फोटोनं दीपिका नाराज झाली. 

Updated: Sep 14, 2014, 07:50 PM IST
“होय मी स्त्री आहे, मला स्तन आहेत” – दीपिका चिडली title=

मुंबई: सार्वजनिक जीवनामध्ये अतिशय शांत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आज अतिशय चिडलेली दिसली. देशातील एका नामवंत वृत्तपत्रानं दिलेल्या एका बातमीनं आणि फोटोनं दीपिका नाराज झाली. 

‘फाइंडिंग फॅनी’ चित्रपटाच्या या अभिनेत्रीनं ट्विटरवर एका वृत्तपत्राचा चांगलाच समाचार घेत आपली नाराजी व्यक्त केली. दीपिकानं या प्रकारावर ट्वीट केलंय. वृत्तपत्रानं एका व्हिडिओमध्ये गाऊनमध्ये असलेल्या दीपिकाचे स्तन आणि त्यातील 'क्लीवेज' दाखवलंय. दीपिकानं ट्वीटनंतर तिच्या पाठिशी अनेक सेलिब्रिटी आणि फॅन्स आलेत. 

दीपिकाची ही पोस्ट एका तासांत १५००हून अधिक जणांनी रिट्विट केलीय. वृत्तपत्रानं आपल्या पोर्टलमध्ये दीपिकाचा ‘क्वीवेज शो’ नावानं व्हिडिओ पोस्ट केलाय. मात्र हा व्हिडिओ जुना आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘चेन्नई एक्स्प्रेस’चा ट्रेलर लॉन्च करतांनाचा हा व्हिडिओ होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.