अभिनेता आदित्य पांचोलीला अटक

जुहू भागातील एका पबमध्ये बाऊन्सरला मारहाण केल्याप्रकरणी, अभिनेता आदित्य पांचोली याला शनिवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. 

Updated: Mar 8, 2015, 03:05 PM IST
अभिनेता आदित्य पांचोलीला अटक title=

मुंबई : जुहू भागातील एका पबमध्ये बाऊन्सरला मारहाण केल्याप्रकरणी, अभिनेता आदित्य पांचोली याला शनिवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहू भागातील हॉटेल सी प्रिन्सेसच्या ट्रायोलॉजी पबमध्ये ही घटना घडली आहे. या पबमध्ये इंग्रजी ऐवजी हिंदी गाणे लावण्यावरुन आदित्य पांचोली याने वाद घातला. 

यावेळी त्याने तेथील बाऊन्सरच्या डोक्यात आपला मोबाईल फोन मारला. त्यामुळे बाऊन्सरच्या डोक्याला दुखापत झाली. या बाऊन्सरने दिलेल्या तक्रारीवरून आदित्य पांचोलीला अटक करण्यात आली आहे.

आदित्य पांचोलीवर सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, पोलिस चौकशी करत आहेत. आदित्य पांचोलीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.