बॉलिवूडमध्ये काय आहे सुरु...रंगरसीया सिनेमावर बंदी

 शुक्रवारी प्रदर्शित होणा-या रंगरसीया या हिंदी चित्रपटावर केरळमध्ये न्यायालयाने बंदी घातलीये. १९ व्या शतकातील महान चित्रकार राजा वर्मा यांच्या जीवनावर हा चित्रपट आहे. त्यामुळे आता निर्मात्याला या चित्रपटाचा राजा रवी वर्मा यांच्या वैयक्तीक जीवनाशी कोणताही संबंध नसल्याची सूचना प्रसिध्द केल्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित करता येणार नसल्याचं कळंतय.

Updated: Nov 7, 2014, 12:58 PM IST
बॉलिवूडमध्ये काय आहे सुरु...रंगरसीया सिनेमावर बंदी title=

मुंबई : शुक्रवारी प्रदर्शित होणा-या रंगरसीया या हिंदी चित्रपटावर केरळमध्ये न्यायालयाने बंदी घातलीये. १९ व्या शतकातील महान चित्रकार राजा वर्मा यांच्या जीवनावर हा चित्रपट आहे. त्यामुळे आता निर्मात्याला या चित्रपटाचा राजा रवी वर्मा यांच्या वैयक्तीक जीवनाशी कोणताही संबंध नसल्याची सूचना प्रसिध्द केल्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित करता येणार नसल्याचं कळंतय.

सलमान खान मुळे अनेक बॉलिवुूड अभिनेत्रींना आपलं अस्तित्व बॉलिवूडमध्ये रोवता आलंय. असंच काहीसं झालंय झालंय ते श्रीलंकन ब्युटी जॅकलीनच्या बाबतीत. नवीन वर्षात तीचे एक नाही तर एकूण चार चित्रपट लागोपाठ प्रदर्शित होणार आहेत.तीचा हा धुमधडका २०१५ मध्ये प्रेक्षकांच्या कितपत पसंत पडतोय तेच पाहायचंय.

सना खान आणि ईस्माइल खान ह्यांना ९ लाख रूपयांचा गंडा घालून फसवणा-या पूनम खन्नाला पोलिसांनी अटक केलीय. सना आणि इस्माईला तिने मुंबईमधल्या एका पूनर्विकासाधिन असलेल्या परिसरात दोन झोपड्या देण्याचं आश्वासन दिल होतं.त्यासाठी तीने ९ लाख रूपये घेतले होते मात्र काही दिवस ती फरार होती.>

शाहरुखची मुलगी सुहानाही...

किंग खान शाहरुख नवीन कलाकारांना आपल्या लूकपेक्षा अभिनयाकडे जास्त लक्ष द्यायला सांगतोय. जो पर्यंत आपण मेहनत करणार नाही तो पर्यंत आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहचता येणार नाही. अभिनय करण्यासाठी नक्कीच मेहनत गरजेची आहे असंही त्याने बॉलिवूडमनध्ये पदार्पण करणा-यांसाठी सांगितलंय.

बॉलिवूड किंग खान शाहरुखची मुलगी सुहानालाही अभिनेत्री व्हायचंय असं शाहरूख म्हणतोय..त्याचा लहान मुलगा अब्रामची झलक हॅपी न्यू ईयरमध्ये दिसल्यानंतर त्यांच्या घरात अभिनयाची आवड फक्त सुहानाला असल्याचं देखील त्याने म्हटलंय.

दबंग सलमान

दबंग सलमान अभिनयामुळे जितका प्रसिद्ध आहे तितकाच तो त्याच्या बिइंग ह्युमनसाठी देखील प्रसिद्ध आहे..नुकतंच त्याने या संस्थेद्वारे कित्येक कॅन्सर पीडीत रुग्णांना मदत केलीये. त्यामुळे अभिनयासोबतच त्याचं सामाजिक भानही त्यांच्या चाहत्यांना भूरळ घालतंय.

कतरीनाची जागा घेतली आलिया भट्टने

कतरीना कैफचा आगामी चित्रपट जग्गा जासुस आणि फँटम 2015 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणारेत...काही दिवसांपूर्वी कतरीना जाहीरात क्षेत्रातही पुढे होती मात्र आता तिची जाहीरात क्षेत्रातली जागा बॉलीवूडचा नवा चेहरा आलिया भट्ट भरुन काढतेय.

सुपरस्टार अक्षय

सुपरस्टार अक्षयचं बॉलिवूडमधलं असणारं स्थान प्रत्येकालाच माहीत आहे...मात्र त्याची पत्नी ट्विंकलला मात्र असं वाटत नाहीये..तिचं असं म्हणणं आहे की माझ्यासाठी फक्त माझे वडीलच सुपर स्टार आहेत. एका कार्यक्रमात अक्षयला विचारलं असता मी त्यांच्या लेवल पर्यंत कधी पोहचू  शकत नाही असं त्याने म्हटलंय.

बॉलिवूड सिंघमच मराठीत

बॉलिवूड सिंघम अजयनेही आता सलमान पाठोपाठ मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केलीय...गेल्या पंचवीस वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत असताना त्याने मराठी कलाकारांसोबतही काम केलंय...महाराष्ट्रात राहत असल्यामुळे मराठीशी असणारं त्याचं नातं आपल्याला सिंघम मधुनही याआधी पाहायला मिळालंय.

सत्यमेव जयतेत महिलाराज

अमिरने सत्यमेव जयतेच्या माध्यमातून विविध विषयावर चर्चा घडवून आणल्यात...मात्र येत्या रविवारी या शोमध्ये महिलाराज अवतरताना दिसणार आहे..चित्रपटात स्त्री-भुमीकांना दिली जाणारी वागणुक यावर चर्चा होत पाहायला मिळणार आहे...या चर्चेत खास दीपिका पदुकोण, परीणीती चोप्रा आणि कंगणा रणावत दिसणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.