मुंबई : बुधवारी सकाळी बिग बॉसच्या घरात सर्व सदस्य पुनीत इस्सार आल्यावर अवाक झालेत, काही जण आनंदी होते तर काही जण हैराण झाले. पुनीतला शिक्षा म्हणून जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. बिग बॉसने सांगितले, की पुनीतला शनिवारपर्यंत प्रेक्षकांच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे.
मंगळवारी एका टास्क दरम्यान आर्या बब्बरवर मार्शल आर्ट प्रयोग करून हल्ला केल्यामुळे पुनीतला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले.
घरातून निघाल्यानंतर पुनीतला पश्चाताप झाला. बिग बॉसने पुनीतचा एक मेसेज घरातील व्यक्तींना ऐकविला. ज्यात पुनीत आपल्या चुकीबबद्दल सर्वांची माफी मागतो. पुनीतने सांगितले की, त्याने टास्क दरम्यान मार्शल आर्टच्या एका मूव्हचा उपयोग केला, ते चुकीचे होते. पण ही मूव्ह अशी नव्हती की त्याने कोणीही जखमी होईल.
पुनीत घरातून बाहेर पडल्यानंतर आर्यावरही आक्षेप घेण्यात आले. पुनीतच्या हल्ल्यानंतर हात दुखत असल्याचे सांगणारा आर्या त्याच हातांनी मशीन चालवत होता. हे पाहिल्यावर गौतम, सुशांत आणि प्रीतमने प्रश्न उपस्थित केला. आर्याच्या सांगण्यावरून पुनीतला घरातून बाहेर काढण्यात आले. आर्याला लागलेच नव्हते तर आरोप लावण्याची काय गरज होती. आता पुनीत आल्यानंतर घरात काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
गौतम गुलाटी जो की पुनीत घराबाहेर गेल्यानंतर रडत होता. तो आता पुनीत घरात आल्यानंतर आनंदाने उड्या मारत आहे. इतके नाही तर प्रीतम आणि प्रणीत भट्टही खूप खूश दिसत आहेत.
या पुनीतच्या एन्ट्रीने आर्या बब्बर खूप निराश आहे.
४६ व्या दिवशी काय झाले पाहा व्हिडिओ.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.