कपिलच्या कमबॅकसाठी अडचणींची शर्यत

मुंबई : कपिल शर्माचे फॅन्स त्याच्या नवीन शोची वाट बघत आहेत.

Updated: Feb 18, 2016, 05:23 PM IST
कपिलच्या कमबॅकसाठी अडचणींची शर्यत title=

मुंबई : कपिल शर्माचे फॅन्स त्याच्या नवीन शोची वाट बघत आहेत. कलर्स चॅनंल सोबत झालेल्या वादानंतर त्याचा शो 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'ने पडद्यावरुन एक्झिट घेतली होती. पण, आता कपिल शर्मालाच परत येण्याची इच्छा आहे. पण, हा कमबॅक सोपा नसेल.

'डीएनए' वृत्तपत्रातील एका बातमीनुसार त्याच्या कपीलच्या नव्या शो मधील कोणाकोणाच्या काय काय भूमिका असतील, याच्यावर कपिलचा सध्या विचार सुरू आहे. या भूमिकांवर विचार करताना त्याला त्या आधीच्या शोपेक्षा वेगळ्या भूमिकेची गरज आहे.

'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'मधील अली असगरने साकारलेली दादी, सुनील ग्रोव्हरची गुत्थी, किकू शारदाची पलक या भूमिकांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केले होते. पण, कपिलकडे या पात्रांचे मालकी हक्क मात्र नाहीत. ही त्याच्यासाठी एक मोठी समस्या आहे.

सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास कपिल यातूनच मार्ग काढण्याच्या प्रयत्नात सध्या आहे. तो कायद्याच्या जाणकारांकडून सल्ला घेतोय. 'कॉमेडी नाईट्स' मधील ती पात्र या नव्या शो मध्ये कायद्याचा भंग न करता कशी काय आणता येतील, यावर तो सध्या काम करतोय. आता हा सर्व शोध पूर्ण होऊन तो कधी पडद्यावर येणार याची त्याचे चाहते वाट बघतायत.