'राब्ता'मध्ये दिसणार दीपिकाचा बोल्ड लूक

सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेननच्या आगामी चित्रपट 'राब्ता'चे ट्रेलर रिलीज होताच त्यांच्या चाहत्यांकडून या ट्रेलरला खूप पसंदी मिळाली.

Intern - | Updated: Apr 27, 2017, 02:31 PM IST
'राब्ता'मध्ये दिसणार दीपिकाचा बोल्ड लूक title=

नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेननच्या आगामी चित्रपट 'राब्ता'चे ट्रेलर रिलीज होताच त्यांच्या चाहत्यांकडून या ट्रेलरला खूप पसंदी मिळाली.

या ट्रेलरसोबत या दोन्ही अभिनेत्यांना सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळाली. परंतु चित्रपटाचे निर्माता होमी अदजानिया यांनी 'राब्ता'च्या सेटवरील दीपिका पदुकोणचा फोटो शेअर करताच सुशांत आणि कृतीचे चाहते आता दीपिका आणि राब्ता यांच्यातील संबंध शोधण्यात मग्न झाले आहेत.

या फोटोमध्ये ती एका रहस्यमय अंदाजात उभी आहे. दीपिका या चित्रपटात 'आइटम सॉंग' करणार आहे. खूप मोठ्या ब्रेकनंतर दीपिका भारतीय चित्रपटातून दिसणार आहे.  तिच्या या गाण्याची एक झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. तिचा हा लूक बघण्यासाठी चाहत्यांची सोशल मीडियावर झुंबड उडाली आहे.

दीपिका आणि होमी हे चांगले मित्र आहेत. होमींच्या 'फाइंडिंग फेनी आणि 'कॉकटेल' या चित्रपटात तिने आधी काम केले आहे. राब्ता चित्रपट ९ जूनला रिलीज होणार आहे.