अंकिता लोखंडे-सुशांत राजपूत यांच्या लग्नाची तारीख ठरली

 छोट्या पडद्यावर 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून यशस्वी पदार्पण केलेली जोडी अंकिता लोखंडे आणि सुशांत राजपूत आता लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची तारीख पक्की झालेय. याला दुजोराही मिळाला आहे. 

Updated: Sep 30, 2015, 07:13 PM IST
अंकिता लोखंडे-सुशांत राजपूत यांच्या लग्नाची तारीख ठरली title=

मुंबई :  छोट्या पडद्यावर 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून यशस्वी पदार्पण केलेली जोडी अंकिता लोखंडे आणि सुशांत राजपूत आता लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची तारीख पक्की झालेय. याला दुजोराही मिळाला आहे. 

अंकिता आणि सुशांत यांचे प्रेम एकता कपूर हिच्या प्रसिद्ध 'पवित्र रिश्ता' झी टिव्हीवरील या मालिकेच्या शुटींगच्यावेळी फुलत गेले. दोघेही या मालिकेत मुख्यभूमिकेत होते. एकत्र काम केल्याने दोघांचे सूर जुळलेत. अनेक वर्षांच्या प्रेमानंतर आता ते दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. २०१६मध्ये लग्न करणार आहेत. याला सुशांतने पुष्टी दिली आहे.

सुशांत आणि अंकिताने आपल्या प्रेमाबाबत कधीही लपवले नव्हते. सुशांतने डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा'च्यावेळी सर्वांसमोर अंकिताला प्रपोज केले होते. सुशांतने सांगितले, माझी आयुष्यभराची गर्लफ्रेंड अंकिताला शानदार लग्न करायचे आहे. सारी प्रोफेशनल कमिटमेंट पूर्ण केल्यानंतर पुढच्यावर्षी लग्न करणार आहोत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.