व्हिडिओ: बिग बींची फिल्‍म 'शमिताभ'चं 'पिडली' गाणं रिलीज

अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट 'शमिताभ'चं पहिलं गाणं 'पिडली' रिलीज झालंय. या गाण्यात अमिताभ इंटेन्स लूकसोबत टॉयलेटमध्ये बसून हे गाणं गातांना दिसतात.

Updated: Dec 31, 2014, 01:28 PM IST
व्हिडिओ: बिग बींची फिल्‍म 'शमिताभ'चं 'पिडली' गाणं रिलीज title=

मुंबई: अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट 'शमिताभ'चं पहिलं गाणं 'पिडली' रिलीज झालंय. या गाण्यात अमिताभ इंटेन्स लूकसोबत टॉयलेटमध्ये बसून हे गाणं गातांना दिसतात.

हे गाणं स्वत: अमिताभ बच्चन यांनी गायलंय. गाण्याचं शूट कोणत्याही स्पेशल सेटवर नाही तर चक्क टॉयलेटमध्ये केलं गेलंय. गाण्यात बिग बी टॉयलेट पेपर ओढतांना आणि म्यूझिक एंजॉय करतांना दिसतो. 

शैबी लूक वाले अमिताभ लिरिक्स वाचत पिडली गाणं गातांना खूप वेगळे दिसतात. गाणं आर बाल्की यांनी दिग्दर्शित केलंय. तर गाण्याला संगीत इल्लय राजाचं आहे. तर मराठमोळे गीतकार स्वानंद किरकिरे यांनी गाण्याचे बोल लिहिलेत. 

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर हे गाणं आपल्या फॅन्ससाठी शेअर केलंय. 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.