मला रणवीरला ठार मारावसं वाटलं- सलमान

अभिनेता रणवीर सिंगनं सुल्तान चित्रपट बघताना केलेला डान्स बघून मला त्याला मारावसं वाटलं अशी प्रतिक्रिया सलमान खाननं दिली आहे. 

Updated: Jul 16, 2016, 09:03 PM IST
मला रणवीरला ठार मारावसं वाटलं- सलमान title=

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगनं सुल्तान चित्रपट बघताना केलेला डान्स बघून मला त्याला मारावसं वाटलं अशी प्रतिक्रिया सलमान खाननं दिली आहे. रणवीर सुल्तान बघायला गेला होता का नाचायला असा प्रश्नही सलमाननं विचारला आहे. 

रणवीर सिंगनं पॅरिसमध्ये सुल्तान चित्रपट बघितला. या चित्रपटातल्या बेबी को बेस पसंद है आणि लगे 440 या गाण्यांवर रणवीर तुफान नाचला. रणवीरच्या या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या डान्सवर सलमाननं हसत हसत ही प्रतिक्रिया दिली आहे. 

रणवीर हा त्याचा आगामी चित्रपट 'बेफिक्रे'च्या शूटिंगसाठी पॅरिसमध्ये होता. त्यावेळी त्यानं थिएटरमध्ये जाऊन सुल्तान बघितला.