विराट - अनुष्का लव्हबर्ड्स पुन्हा एकत्र

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्मा - विराट कोहली यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरु होती. विराटची लग्नाची मागणीदेखील अनुष्काने फेटाळल्याचे वृत्त आलेले. यावर कोणीच भाष्य केले नव्हते. आता हे लव्हबर्ड्स दुसऱ्यांना एकत्र दिसून आलेय.

Updated: May 24, 2016, 03:52 PM IST
विराट - अनुष्का लव्हबर्ड्स पुन्हा एकत्र title=
सौजन्य- इंन्स्टाग्राम

बंगळुरु : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्मा - विराट कोहली यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरु होती. विराटची लग्नाची मागणीदेखील अनुष्काने फेटाळल्याचे वृत्त आलेले. यावर कोणीच भाष्य केले नव्हते. आता हे लव्हबर्ड्स दुसऱ्यांना एकत्र दिसून आलेय.
 

दरम्यान, त्यांच्यात बिनसलेय. दोघे वेगळे झालेत, असे वृत्त होते. मात्र त्यानंतर ते दोघे एकत्र कुठेही न दिसल्याने ब्रेकअपचे वृत्त खरे असल्याचे वाटू लागले. मात्र, प्रत्यक्षात तसं काहीही नाही. हे लव्हबर्ड्स बंगळुरुमध्ये पुन्हा एकदा एकत्र दिसून आले आहेत. नुकतेच विराट अणि अनुष्काला मुंबईत एका रेस्ट्रॅारंटमध्येही एकत्र पाहण्यात आले होते.

आयपीएलच्या मॅचपूर्वी विराट आणि अनुष्काने बंगळुरु एकत्र वेळ घालवत होते. एवढंच नव्हे तर एकमेकांच्या कंपनीत खूप खुशही दिसत होते. त्यांनी चाहत्यांसोबत एकत्र फोटोही काढला असून एका चाहतीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला तेव्हा हे सत्य बाहेर आले.