'सैराट'च्या नुसत्या गाण्याच्या प्रोमोनंच प्रेक्षकांना 'याड लागलं'!

आजच्याच दिवसाचा मुहूर्त साधत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या आगामी सिनेमाच्या गाण्याचा प्रोमो प्रदर्शित केलाय. 

Updated: Jan 1, 2016, 03:32 PM IST

मुंबई : नवीन वर्षाच्या मुहूर्ताला आज 'नटसम्राट'च्या रुपात एक भारदस्त सिनेमा रीलीज झालाय आणि आजच्याच दिवसाचा मुहूर्त साधत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या आगामी सिनेमाच्या गाण्याचा प्रोमो प्रदर्शित केलाय. 

'एस्सेल व्हिजन'ची निर्मिती असलेला या सिनेमातील गाणी अजय - अतुलनं संगतीबद्ध केलेत. 

‘फॅन्ड्री’ हा नंतर नागराज मंजुळे यांचा चित्रपट हिट ठरला होता. या सिनेमानं अनेक पुरस्कारही आपल्या नावावर नोंदवले होते. त्यामुळे, आता 'सैराट' या सिनेमाकडूनही प्रेक्षकांना अपेक्षा असणं साहजिकच आहे.