व्हिडिओ : पाहा, अनुष्काच्या 'एनएच १०'चा ट्रेलर

अभिनेत्री अनुष्का शर्मा 'एनएच १०' या सिनेमाद्वारे एका निर्मात्याच्या भूमिकेत पदार्पण करतेय. 'फॅंटम'च्या बॅनरखाली निर्माण झालेला हा सिनेमा बराच चर्चिला जातोय. 

Updated: Feb 6, 2015, 08:09 AM IST
व्हिडिओ : पाहा, अनुष्काच्या 'एनएच १०'चा ट्रेलर title=

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा 'एनएच १०' या सिनेमाद्वारे एका निर्मात्याच्या भूमिकेत पदार्पण करतेय. 'फॅंटम'च्या बॅनरखाली निर्माण झालेला हा सिनेमा बराच चर्चिला जातोय. 

या सिनेमात अनुष्काची एक दमदार भूमिका पाहायला मिळणार आहे. हरियाणाच्या खाप पंचायतीचं चित्र या सिनेमात उभं करण्यात आलंय. अनुष्कासोबत या सिनेमात नील भूपालमही दिसणार आहे. 

या सिनेमाचं दिग्दर्शन नवदीप सिंहनं केलंय. हा सिनेमा येत्या ६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. 

व्हिडिओ पाहा :- 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.