मुंबई : 'मुंबई - पुणे - मुंबई'च्या यशानंतर आता या सिनेमाचा दुसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'मुंबई - पुणे - मुंबई 2'चा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय.
सतीश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमात स्वप्नील जोशी आणि मुक्त बर्वे हेच जोडपं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. याशिवाय, प्रशांत दामले, सविता प्रभुणे यांच्याही प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.
गौतम आणि गौरी (होय, या भागात या दोघांना नावं आहेत). लग्न जमल्यानंतर दोघांच्या मनात उडालेल्या अनेक गोष्टी या सिनेमात चित्रीत करण्यात आल्यात, असं तरी हा ट्रेलरमध्ये दिसून येतंय.
व्हिडिओ पाहा : -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.