मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन याच्यापासून विभक्त झालेली त्याची पत्नी सुझान खान हिच्या दुसऱ्या लग्नाच्या बातम्या बॉलिवूडच्या वर्तुळात चघळल्या जातायत.
सुझान ही ऋतिक रोशन याच्या एका जवळच्या मित्रासोबतच दुसरं लग्न करणार असल्याचं म्हटलं जात होतं. तो अभिनेता म्हणजे अभिनेता अर्जुन रामपाल असल्याचंही म्हटलं जातंय. कदाचित यासंबंधीच अर्जुन रामपालनंही ट्विटरवर ऋतिकला निशाणा केल्याचं आता म्हटलं जातंय.
अधिक वाचा - हृतिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता सुझान करणार दुसरं लग्न
अर्जुन रामपालनं ट्विटरवर 'गेम ती लोक खेळतात ज्यांच्यात असुरक्षिततेची भावना असते. अशा लोकांना आत्मविश्वास मिळो यासाठी प्रार्थना करतो... आशा आहे की हे लोक लवकर स्वत:ला माफ करू शकतील' असं म्हटलंय. अर्जुनची ही प्रतिक्रिया ऋतिकबद्दल असल्याचं आता म्हटलं जातंय.
अधिक वाचा - सुझान खानच्या आईनं दिली तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत प्रतिक्रिया
उल्लेखनीय म्हणजे, अर्जुन रामपाल आणि ऋतिक रोशन हे एकेकाळी खूप चांगले मित्र राहिलेत. परंतु, सुझान आणि ऋतिकच्या घटस्फोनंतर सुझान अर्जुनशी विवाह करणार असल्याच्या चर्चांना उधाण आल्यानं आता अर्जुन-ऋतिक या दोघांमध्ये दुरावा वाढल्याचं दिसतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.