व्हिडिओ : 'बेबी' नाही बाप अक्की!

अभिनेता अक्षय कुमारचा आगामी सिनेमा 'बेबी' लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. बुधवारी सायंकाळी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. 

Updated: Dec 3, 2014, 10:56 PM IST
व्हिडिओ : 'बेबी' नाही बाप अक्की! title=

नवी दिल्ली : अभिनेता अक्षय कुमारचा आगामी सिनेमा 'बेबी' लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. बुधवारी सायंकाळी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. 

या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार गंभीर आणि अॅक्शन-पॅक्ड अवतारात दिसतोय. 'अ वेन्सडे' आणि 'स्पेशल 26' सारख्या सिनेमांसाठी ओळखला जाणारा नीरज पांडे या सिनेमाचं दिग्दर्शन करतोय. त्यामुळे या सिनेमाच्या 'बेबी' नावानं प्रेक्षकांमध्ये काहीसं कुतूहल निर्माण झालं होतं... या सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर हे कुतूहल आणखीनचं वाढताना दिसतंय.  

'बेबी'मध्ये अनुपम खेर, तापसी पन्नू आणि मधुरिमा तुली यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा नेपाळ, काठमांडू, दिल्ली आणि अबू धाबीतल्या विविध लोकेशन्सवर शूट करण्यात आलाय. हा सिनेमा 23 जानेवारी 2014 रोजी सिनेघरांत दाखल होणार आहे.  

सिनेमाचा ट्रेलर पाहा :-
 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.