सनी लिऑन दिसणार ममताच्या भूमिकेत...

बॉलीवूडची बेबीडॉल सनी लिऑन लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सनी लिऑन ममता कुलकर्णीचा रोल करणार असल्याचं समजतंय.

Updated: Dec 3, 2014, 09:15 PM IST
सनी लिऑन दिसणार ममताच्या भूमिकेत... title=

नवी दिल्ली : बॉलीवूडची बेबीडॉल सनी लिऑन लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सनी लिऑन ममता कुलकर्णीचा रोल करणार असल्याचं समजतंय.

जेष्ठ फोटोग्राफर जयेश सेठ हे ममताच्या आयुष्यावर चित्रपट बनविण्याचा विचार करत आहेत.... आणि जयेशच्या मते ममताचा रोल करण्यासाठी सनी ही योग्य व्यक्ती आहे.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, 90 च्या दशकात ममता कुलकर्णी हीचं टॉपलेस फोटोशूट ज्यानं कॅमेऱ्यात कैद केलं होतं... तोच हा फोटोग्राफर... जयेश सेठ... जयेशनं केलेल्या याच फोटोशूटनं ममता कुलकर्णीला एका रात्रीत स्टार बनवलं होतं.

हा चित्रपट ममता कुलकर्णीच्या आयुष्यावर आधारित असेल. एकेकाळी अवघ्या बॉलिवूड सृष्टीवर राज्य करणारी ममता पडद्यामागे पडल्यानंतर अचानक बॉलिवूडमधून गायब झाली होती. त्यानंतर, ती काही दिवसांपूर्वी साध्वी बनून राहत असल्याचं वृत्त आलं होतं... पण, काही दिवसांपूर्वी मात्र ड्रग्ज तस्कारीच्या आरोपाखाली ममता आणि तिच्या लिव्ह इन पार्टनरला अटक करण्यात आली होती.

जयेशच्या म्हणण्यानुसार, सनी लिऑन आणि ममता कुलकर्णी यांच्या दिसण्यात साम्य आहे तसंच दोघींच्या चेहऱ्यावरच्या निरागसपणातही साम्य आहे.

मात्र, सनी लिओनला जेव्हा याबाबत विचारण्यात आलं तेव्हा आपल्याला याबाबत अद्याप कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचं तिनं स्पष्ट केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.