VIDEO : जर्मनीतही घुमले मराठमोळ्या अजय-अतुलचे सूर!

जगातल्या सर्वात मोठ्या उद्योग मेळाव्यातल्या भारतीय दालनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जर्मनीतील हॅनोव्हर शहरात झालं. याप्रसंगी जे स्वागतगीत सादर करण्यात आलं, त्याचं संगीत मराठमोळ्या अजय-अतुल या संगीतकार जोडीनं दिलं होत. 

Updated: Apr 14, 2015, 08:32 PM IST
VIDEO : जर्मनीतही घुमले मराठमोळ्या अजय-अतुलचे सूर! title=

हॅनोव्हर, जर्मनी : जगातल्या सर्वात मोठ्या उद्योग मेळाव्यातल्या भारतीय दालनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जर्मनीतील हॅनोव्हर शहरात झालं. याप्रसंगी जे स्वागतगीत सादर करण्यात आलं, त्याचं संगीत मराठमोळ्या अजय-अतुल या संगीतकार जोडीनं दिलं होत. 

यानिमित्तानं अजय-अतुल यांच्या शिरपेचात आणखी एक यशाचा तुरा खोवला गेलाय. यापूर्वी प्रजासत्ताक दिन सोहळ्यात महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी अजय-अतुल यांच्या माऊली माऊली गाण्याची थीम वापरण्यात आली होती. या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालाय. आता अजय-अतुल यांच्या मधूर संगीताचे सूर पार जर्मनीत गुंजतायत.

व्हिडिओ पाहा :- 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.