पाहा आता बिग बॉसच्या घरात कोण-कोण असेल?

 छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉसच्या आठव्या सिझनला सुरूवात होतेय. या शोचा निमंत्रक बॉलीवूडचा दबंग सलमान खान करणार आहे. यावेळी बिग बॉसच्या घरात कोण असेल याची उत्सुकता लोकांना लागून आहे.

Updated: Sep 22, 2014, 12:04 AM IST
पाहा आता बिग बॉसच्या घरात कोण-कोण असेल? title=

मुंबई :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉसच्या आठव्या सिझनला सुरूवात होतेय. या शोचा निमंत्रक बॉलीवूडचा दबंग सलमान खान करणार आहे. यावेळी बिग बॉसच्या घरात कोण असेल याची उत्सुकता लोकांना लागून आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार यावेळी १५ वेगवेगळ्या हस्ती या शोमध्ये सामील होणार आहेत. खालील सेलिब्रिटी बिग बीच्या नव्या शोमध्ये सामील होणार आहेत.ॉ

उपेन पटेल : मॉडेल-एक्टर उपेन पटेलचं फिल्मी करिअर एवढं व्यवस्थित राहिलेलं नाही, पण तरीही उपेनला बिग बॉसमध्ये स्थान मिळालंय, उपेनने 'नमस्ते लंदन' आणि '36 चाइना टाउन' मध्ये अभिनय केला आहे.

मिनिषा लांबा : अभिनेत्री मिनिषा लांबाचं फिल्मी करिअरमध्ये अनेक उतार-चढ़ाव आले. मिनिषा ने 'बिग बॉस' घरात जाणार असल्याचं स्पष्ट केलंय.  मिनिषाने 'कॉरपोरेट', 'शौर्य', 'दस कहानियां' आणि इतर चित्रपटात काम केलंय.

प्रनीत भट्ट : प्रनीत टेलीव्हिजनचा कलाकार आहे। प्रनीतने 'गीत हुई सबसे पराई' सीरियल मध्ये दमदार रोल केला आहे। प्रनीतने 'महाभारत' मध्ये शकुनीचा अभिनय करून वाहवा मिळवली होती.

गौतम गुलाटी : गौतम गुलाटी देखिल टेलीव्हिजनचे कलाकार आहेत. सीरियल 'दीया और बाती हम' मध्ये गौतमचं काम प्रशंसनीय ठरलंय. 

आर्य बब्बर : अभिनेता आणि नेता राज बब्बर यांच्या मुलगा आर्यने 'अब के बरस' चित्रपटात काम केलं आणि बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं, मात्र बॉलीवूडमध्ये चालला नाही.

करिश्मा तन्ना : करिश्मा सीरियल 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मध्ये अभिनय करत होती.करिश्मा लहान पडद्यावर प्रसिद्ध आहे.  

सुशांत दिगविजकर: सुशांत बहुमुखी प्रतिभेचा धनी असलेला कलाकार आहे। सुशांत रंगमंच, टेलीव्हिजन-चित्रपटांशी जोडला गेला आहे.  सुशांतने 'मिस्टर गे इंडिया 2014' चा  खिताब जिंकलाय.

सोनी सिंह : मॉडल ते अभिनेत्री असलेली सोनी सिंह बॉलीवुड मध्ये आपली ओळख बनवू इच्छितेय. 

सुकीर्ति कंडपाल : टेलीव्हिजन शो 'दिल मिल गए' पासून चर्चेत आलेली सुकीर्ति 'बिग बॉस' मध्ये नवी सुरूवात करणार आहे। सुकीर्तीने 'प्यार की ये इक कहानी' आणि 'कैसा ये इश्क है...अजब सा रिस्क है' मध्ये अभिनय केला आहे.

डाएंड्रा सोरेस : डाएंड्रा मॉडलिंग, एंकरिंग आणिन फॅशन डिजायनिंगमध्ये माहिर आहे. डाएंड्रा रँपवर आपल्या खास अंदाजासाठी ओळखली जाते. अ

दीपशिखा नागपाल : दीपशिखा हिंदी आणि पंजाबी चित्रपट अभिनेत्री आहे. दीपशिखा टीव्ही सीरियल्समध्येही काम करते. 

पुनीत इस्सर : पुनीतने'महाभारत' मध्ये दुर्योधनची पार पाडली आहे.

अजीत चंदीला : आईपीएलमधील फिक्सिंग वादात आलेला क्रिकेटर अजीत चंदीला 'बिग बॉस' च्या घरात प्रवेश करू शकतो.

आर जे प्रीतम : रेड एफएमची जॉकी प्रीतम 'बिग बॉस'च्या घरात येऊ शकते.

नताशा स्तानकोविक : साइबेरियाची ब्यूटी नताशा 'बिग बॉस' च्या घरात आपलं ग्लॅमर दाखवणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.