वीणा मलिकच्या घरी नव्या पाहुण्याचं स्वागत

बॉलिवूड आणि पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हीनं आज एका मुलाला जन्म दिलाय. त्याचं ‘अबराम’ असं नामकरणंही करण्यात आलंय. 

Updated: Sep 23, 2014, 04:18 PM IST
वीणा मलिकच्या घरी नव्या पाहुण्याचं स्वागत title=

मुंबई : बॉलिवूड आणि पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हीनं आज एका मुलाला जन्म दिलाय. त्याचं ‘अबराम’ असं नामकरणंही करण्यात आलंय. 

वॉशिंग्टन डीसी (यूएसए) च्या वर्जिना हॉस्पीटलमध्ये विणानं आज एका गोंडस मुलाला जन्म दिलाय. गेल्या वर्षी 25 डिसेंबर रोजी वीणानं दुबईचा बिझनेसमन असद बशीर खान याच्यासोबत अचानक विवाह केल्याची बातमी धडकली होती. 
बॉलिवूडमध्ये, येत्या 17 ऑक्टोबर रोजी वीणाचा ‘मुंबई 125 KM’ प्रदर्शित होणार आहे. अशातच सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच तिच्या घरी एक सुखद बातमी आलीय.

वीनाचा पती असद बशीर खान आपल्या या मुलाच्या जन्मावर खुपच खूश आहे. त्यानं ट्विटरवरून आपला हा आनंद व्यक्त केलाय. ‘थँक्यू अल्लाह पाक... अबराम खान खट्टक या मुलाच्या जन्माचा आनंद दिल्याबद्दल’... याबद्दल असदनं वीणालाही धन्यवाद दिलेत. असद-विणानं आपल्या मुलाचं नामकरण अबराम असं केलंय. 
 
उल्लेखनीय म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याच्याही मुलाचं नाव ‘अबराम’ असं आहे. असद इतका खूश आहे की त्यानं आपल्या या एका दिवसाच्या मुलाचं ट्विटर अकाऊंटही ओपन केलंय. 

‘आज मला सर्वकाही मिळालंय. आई बनल्यानंतर एका स्त्रीला सगळं काही प्राप्त होतं. मी आयुष्यात यश, पैसा सगळं मिळवलंय. पण, आई बनल्यानंतर पैशांचं काहीही महत्त्व उरत नाही’ असं वीणानं आई बनल्यानंतर म्हटलंय.

पाहा, ट्विटरवर काय म्हटलंय असदनं...

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.