वीणा मलिकनं दिला दुसऱ्या अपत्याला जन्म

'बिग बॉस'फेम वादग्रस्त पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिनं आपल्या दुसऱ्या अपत्याला नुकताच जन्म दिलाय. 

Updated: Sep 26, 2015, 04:48 PM IST
वीणा मलिकनं दिला दुसऱ्या अपत्याला जन्म title=

नवी दिल्ली : 'बिग बॉस'फेम वादग्रस्त पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिनं आपल्या दुसऱ्या अपत्याला नुकताच जन्म दिलाय. 

अमेरिकेतल्या वर्जिनियामध्ये वीणानं एका मुलीला जन्म दिलाय. वीणाचा पती असद बशीर यानं आपला आनंद ट्विटरवरून शेअर केलाय. यावेळी, त्यानं बाळाचे फोटोही शेअर केलेत.

वीणा-असदनं या बाळाचं नामकरण अमल असद खान असं केलंय. वीणा आणि असद 25 डिसेंबर 2013 रोजी विवाहबद्ध झाले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.