मुंबई : 'वक्रतुंड महाकाय' या मराठी सिनेमातून मुंबईत बॉम्ब स्फोट करण्याचा घाट कसा घातला जातो आणि तो बाप्पा कसा उधळतो, हे दाखविण्याचा प्रयत्न दिसतो. ते ट्रेलरमधून दाखविण्यात आलेय.
अधिक वाचा : Video - एकटेच अमिताभ बच्चन लिफ्टमध्ये डान्स करतात तेव्हा...
छोटेसे काम दिले. मात्र, तेही तुम्ही पूरे केले नाहीत. तुमचा शेवट आता आलाय, अशी सुरुवात आहे. कारण दिलेले काम त्या दोघांनी पुरे केलेले नाही. गणपतीच्या टेडीमध्ये बॉम्ब लपवून तो देवळातील एका बाकड्यावर ठेवला जातो. मात्र, रिमोट दाबायच्या आधीच एक लहान मुलगा गणपतीचा तो टेडी घेऊन पळून जातो. त्यामुळे त्याचा हेतू सफल होत नाही. ते शहरात बाईकवरून कुठे स्फोट होतो का ते पाहण्यासाठी जातात. गणपतीची मिरवणूक सुरु असते. फटाके फोडले जातात. त्याचा आवाज होतो आणि त्यांना वाटते आपले काम सफल झाले. ( पण तो फटाक्यांचा आवाज असतो.)
ते एका ठिकाणी चौकशी करतात. बॉम्बस्फोट झालाय का. त्यावेळी एक महिला हो म्हणते. त्यांचा आनंद होतो. त्याचवेळी ती सांगते, पाकिस्तानात स्फोट झाला. कराचीत हा स्फोट होतो. हे टिव्हीवर दाखवले जाते. मात्र, त्यांना वाटतो भारतात झालाय. त्यामुळे गणपतीच्या टेडीमध्ये ठेवलेला बॉम्ब फुटल्याचा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होतो. मात्र, खरा स्फोट हा पाकिस्तानात झाल्याचे पाहून ते गप्पच होतात.
यात एक डायलॉग आहे, दुनिया का बम्ब भगवान को नही मार सकता. या सिनेमातून ते दाखविण्याचा प्रयत्न दिसत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.