'एकीला डेट, दुसरीशी लग्न आणि तिसरीला मारायचंय'

न्यू कमर असून बॉलिवूडमध्ये आपलं ठसठशीतपणे आपली उपस्थित जाणवून देणाऱ्या बॉलिवूडच्या 'हम्प्टी शर्मा'वर तर अनेक तरुणी आपला जीव ओतताना दिसतात... पण, मग हम्प्टीचं काय? त्याच्या मनात कोण भरलंय?

Updated: Sep 23, 2015, 03:44 PM IST
'एकीला डेट, दुसरीशी लग्न आणि तिसरीला मारायचंय' title=

मुंबई : न्यू कमर असून बॉलिवूडमध्ये आपलं ठसठशीतपणे आपली उपस्थित जाणवून देणाऱ्या बॉलिवूडच्या 'हम्प्टी शर्मा'वर तर अनेक तरुणी आपला जीव ओतताना दिसतात... पण, मग हम्प्टीचं काय? त्याच्या मनात कोण भरलंय?

एका मॅगझीनला मुलाखत देताना त्यानं याच प्रश्नाचं उत्तर दिलंय. वरुणच्या मनात एक नाही अनेक जणी भरल्यात... त्यातील दीपिका पादूकोण, प्रियांका चोप्रा आणि श्रद्धा कपूर यांच्यापैंकी तू कुणाला डेट करशील? कुणासोबत लग्न करशील? आणि कुणाला मारशील? असा प्रश्न विचारला. तेव्हा जराही वेळ न दवडता वरुणनं श्रद्धा कपूरशी लग्न करायला, प्रियांकाला डेट करायला आवडेल आणि दीपिकाला मारायला.... असं उत्तर दिलंय. 

दीपिका रणवीर सिंगला डेट करतेय, म्हणून दीपिकाला मारायचंय असं वरूणनं म्हटलंय. अर्थातच, बॉलिवूडमध्येही आता दीपिका - रणवीरच्या प्रेमाच्या चर्चा रंगू लागल्यात असं म्हणायला हरकत नाही. 

आलिया भट्टसोबत 'स्टुडंट ऑफ द इअर' मधून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या वरुण धवननं सलग पाच हीट सिनेमे बॉलिवूडला दिलेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.