OMG : सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

बॉलिवूडचा दबंग खान हा नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. पण आता तो चर्चेत आला आहे त्याला देण्यात आलेल्या धमकीमुळे. विशेष म्हणजे ही धमकी सलमानला थेट न देता मुंबई पोलिसांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Updated: Feb 22, 2016, 09:30 PM IST
OMG : सलमान खानला जीवे मारण्याची धमकी title=

मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान हा नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. पण आता तो चर्चेत आला आहे त्याला देण्यात आलेल्या धमकीमुळे. विशेष म्हणजे ही धमकी सलमानला थेट न देता मुंबई पोलिसांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षेत सुमारे ११ दिवसांपूर्वी हा फोन आला होता. पोलिसांना फोन करून अज्ञात व्यक्तिने अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली. कोणीतरी मस्करी करण्याच्या उद्देशाने हा फोन केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पण तरीही मुंबई पोलिसांनी कोणताही हलगर्जीपणा न बाळगत या अज्ञात इसमाचा तपास सुरू केला आहे. जीवे मारण्याची धमकी देणारी ही अज्ञात व्यक्ती कोण आहे. याचा तपास लावला जाईल, असं नेहमी सतर्क असणाऱ्या मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.