पाहा किती कमाई केलीये उडता पंजाबने

सेन्सॉर बोर्डासोबतच्या बऱ्याच संघर्षानंतर अखेर प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब हा चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तितकीशी चांगली कमाई करु शकलेला नाहीये.

Updated: Jun 18, 2016, 01:46 PM IST
पाहा किती कमाई केलीये उडता पंजाबने title=

मुंबई : सेन्सॉर बोर्डासोबतच्या बऱ्याच संघर्षानंतर अखेर प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब हा चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तितकीशी चांगली कमाई करु शकलेला नाहीये.

पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०.०५ कोटींची कमाई केलीये. चित्रपटाला समीक्षकांनी चांगली पसंती दिलीये. मात्र अपेक्षेप्रमाणे हा चित्रपटाची पहिल्या दिवशी कमाई होऊ शकली नाही. 

शाहिद कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर खान आणि दिलजीत दोसांज स्टारर हा चित्रपट २००० थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.