राणादाची वहिनी नंदिता आता मराठी सिनेमात

झी मराठी वाहिणीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनीची व्यक्तीरेखा साकारणारी धनश्री काडगांवकर नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 10, 2017, 11:36 PM IST
 राणादाची वहिनी नंदिता आता मराठी सिनेमात title=
सौजन्य : झी मराठी

मुंबई : झी मराठी वाहिणीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनीची व्यक्तीरेखा साकारणारी धनश्री काडगांवकर नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत राणा आणि अंजली पाठक यांच्या प्रेमात नेहमी अडथळा आणणारी ही नंदिता वहिनी लवकरच ‘निखिल फिल्म्स’ प्रस्तूत सत्यघटनेवर आधारित ‘ब्रेव्हहार्ट’ जिद्द जगण्याची या आगामी मराठी सिनेमातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
 
धनश्री ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील नकारात्मक भूमिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. ‘ब्रेव्हहार्ट’ या सिनेमाचे निर्माते सच्चिदानंद गोपीनाथ कारखानीस आणि संतोष यशवंत मोकाशी निर्मित सिनेमाचे दिग्दर्शन दासबाबू यांनी केले आहे.

धनश्री काडगांवकर ‘ब्रेव्हहार्ट’ चित्रपटात अभिनेता संग्राम समेळ याच्यासोबत झळकणार आहे. या सिनेमात संग्राम सोबत अरुण नलावडे, अतुल परचुरे, सुलभा देशपांडे, किशोर प्रधान, डॉ. विलास उजवणे, विजय चव्हाण, इला भाटे, अभय कुलकर्णी, शमा निनावे, प्रदीप भिडे आदी कलाकार आहेत.