“डाबंऱ्या “ प्रेम हे "ची तिसरी कथा झी युवावर

प्रेम हे प्रेम असत! रूप, रंग, समाज ह्यांचा विचार न करता ते आपोआप  घडतं .. ही गोष्ट अशाच एका मुलाची, जो रंगाने काळा आहे आणि तो एका अतिशय सुंदर मुलीवर प्रेम करतो ... तीही त्याच्या प्रेमात पडते ... कोणाची कसलीही तमा न बाळगता ते दोघे एकमेकांचे होतात. आणि ज्यावेळेस निर्णायक क्षण येतो तेव्हा अश्या काही अनपेक्षित गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडतात, कि ज्याची कोणी कल्पनाही केलेली नसते. "प्रेम हे "ची नवीन गोष्ट आहे "डाबंऱ्या ".. येत्या सोमवार १३ मार्च आणि मंगळवार १४ मार्च ला रात्री ९ वाजता प्रथमेश परब आणि कृतिका देव यांची एक काळजाला हात घालणारी अप्रतिम प्रेमकथा झी युवावर पाहायला मिळेल.  

Updated: Mar 10, 2017, 08:11 PM IST
“डाबंऱ्या “ प्रेम हे "ची तिसरी कथा झी युवावर  title=

मुंबई : प्रेम हे प्रेम असत! रूप, रंग, समाज ह्यांचा विचार न करता ते आपोआप  घडतं .. ही गोष्ट अशाच एका मुलाची, जो रंगाने काळा आहे आणि तो एका अतिशय सुंदर मुलीवर प्रेम करतो ... तीही त्याच्या प्रेमात पडते ... कोणाची कसलीही तमा न बाळगता ते दोघे एकमेकांचे होतात. आणि ज्यावेळेस निर्णायक क्षण येतो तेव्हा अश्या काही अनपेक्षित गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडतात, कि ज्याची कोणी कल्पनाही केलेली नसते. "प्रेम हे "ची नवीन गोष्ट आहे "डाबंऱ्या ".. येत्या सोमवार १३ मार्च आणि मंगळवार १४ मार्च ला रात्री ९ वाजता प्रथमेश परब आणि कृतिका देव यांची एक काळजाला हात घालणारी अप्रतिम प्रेमकथा झी युवावर पाहायला मिळेल.  

कलर गया तो पैसा वापीस घ्या कॅटेगरीत मोडणारा काळ्या रंगाची घमेंड असेलेला    "डाबंऱ्या ". ची ही गोष्ट . पोरी कलर बघून प्रेम करत नाहीत. खरंतर प्रेम म्हणजे नक्की काय हेही "डाबंऱ्या “. ला माहित नाही . अतिशय गरीब, झोपड्पट्टीत राहणारा हा मुलगा, पण स्वतःवर आणि त्याहून जास्त स्वतःच्या बोलबच्चन वर पूर्णपणे विश्वास ठेवणारा असा हा. ह्याच्या अगदीच उलट मोनिका. श्रीमंत घरातील पांढरी शुभ्र, अतिशय देखणी ... सुंदर आणि हुशार ... प्रेमाबाबद्दल तीच म्हणणं वेगळंच आहे. आताच्या जनरेशनला प्रेमात पडणं आणि वाहत जाण वैगरे फारसं पटत नाही. सगळेच सध्या करिअर ओरिएंटेड आहेत आणि प्रेम न केल्याने आमचं काही बिघडतं नाही ... म्हणून त्यापासून लांब राहणं पसंद करतात.  पण प्रेमाला भाषा नसते, असते ती केवळ भावना ... जी कधी कशी आणि कोणाला समजेल उमगेल याची शास्वती कोणीही देऊ शकत नाही.

 महाविद्यालयीन आयुष्यात अनेक तरुण तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडतात. आयुष्यभर साथ निभावण्याच्या शपथा खातात. काहींना ते प्रेम निभावताही येते.  तर काहींना खरे प्रेम काय असते याचा अर्थही कळत नसतो.  डाबंऱ्या आणि मोनिका हि दोन वेगळ्या मताची ,  भिन्न सामाजिक स्तरातील तरुण तरुणी ,  कश्या प्रकारे एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि पुढे या प्रेमाचं नक्की काय होत हे झी युवावरील प्रेम हे या मालिकेतील  "डाबंऱ्या ".ह्या गोष्टीत पाहणे उत्कंठावर्धक नक्कीच ठरेल .  
 
 
डाबंऱ्या ही   झी युवाची संकल्पना असून प्रथमेश परब आणि कृतिका देव हे मुख्य भूमिकेत आहेत, तर गणेश पंडित यांच्या लेखणीतून कथा साकारली आहे आणि या  गोष्टीचे दिग्दर्शन प्रवीण परब यांनी केले आहे . दर सोमवार-मंगळवार रात्री ९ वाजता वेगवेगळ्या कथांतून "प्रेम हे” झी युवावर उलगडत जाईल.