अक्षय कुमारच्या रुस्तमचा टायटल ट्रॅक रिलीज

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याचा चित्रपट 'रुस्तम'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

Updated: Jul 14, 2016, 09:03 PM IST
अक्षय कुमारच्या रुस्तमचा टायटल ट्रॅक रिलीज title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याचा चित्रपट 'रुस्तम'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचवेळी रुस्तमचा टायटल ट्रॅक रिलीज करण्यात आला आहे. रुस्तम वही असं या गाण्याचा टायटल ट्रॅक आहे. सुकृती कक्कडनं हा टायटल ट्रॅक गायला आहे. 

अक्षय या चित्रपटामध्ये नेव्ही ऑफिसरची भूमिका करत आहे. रुस्तम या चित्रपटाची कहाणी सत्य घटनेवर आधारित आहे. अक्षयबरोबरच या चित्रपटात इलियाना, अर्जन बाजवा आणि इशा गुप्ता मुख्य भूमिकेमध्ये आहेत. 12 ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होणार आहे.