'टाइमपास टू'चा पहिल्याचं दिवशी कोट्यवधींचा धमाका

'टाइमपास २' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी शुक्रवारी ३ कोटी ८० लाख रूपयांचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट मराठीत ५० कोटींचा गल्ला जमवणारा पहिला मराठी चित्रपट ठरेल का?, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Updated: May 4, 2015, 06:27 PM IST
'टाइमपास टू'चा पहिल्याचं दिवशी कोट्यवधींचा धमाका title=

मुंबई : 'टाइमपास २' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी शुक्रवारी ३ कोटी ८० लाख रूपयांचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट मराठीत ५० कोटींचा गल्ला जमवणारा पहिला मराठी चित्रपट ठरेल का?, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
दगडू आणि ‘पराजू‘च्या पहिल्या ‘टाइमपास‘ला चांगली दाद मिळाल्याने त्याच धर्तीवर ही प्रेम कहाणी पूर्ण करणाऱ्या ‘टाइमपास-२‘ या त्याच्या पुढील भागालाही मराठी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. 

रवी जाधव यांचे दिग्दर्शन असलेला ‘टाइमपास २‘ महाराष्ट्र दिनाच्या सुटीचा मुहूर्त साधत प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई केली आहे. सर्वत्र या चित्रपटासाठी प्रेक्षकांची बॉक्स ऑफिसवर गर्दी होत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील ही बॉक्स ऑफिसवरील पहिल्या दिवशीची विक्रमी कमाई आहे. या व्यावसायिक यशाबद्दल चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक खूश आहेत. सलग चार दिवसांची सुटी ‘टाइमपास २‘च्या पथ्यावर पडली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.