मुंबई : बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या प्रेमप्रकणामुळे अधिक चर्चेत आहे. सध्या त्याचे दिशा पटनीसोबत डेटिंग आहे. मात्र, तिला तो न भेटताच काढता पाय घेतो, असे दिसून आलेय. दोन वेळा अशी घटना घडली. मुंबईत एका हॉटेलमध्ये डिनर घेण्यासाठी टायगर आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा पटनी यांचे ठरले होते. त्यानुसार दिशा आधी पोहोचली. पण...
मुंबईत एका हॉटेलमध्ये डिनर डेटसाठी टायगर आणि त्याची प्रेयसी दिशा पटनी भेटणार होती. तस नियोजनही झालं. टायगरही हॉटेलमध्ये पोहोचलाही. मात्र, टायगर हॉटेलमध्ये आल्याचे वृत्त समजताच त्याच्या चाहत्यांनी हॉटेलबाहेर गर्दी केली. त्यानंतर माध्यमांचे प्रतिनिधी देखील तेथे पोहोचले.
दिशा पटनी ही टायगरच्या आधीच हॉटेलमध्ये पोहोचली होती. पण टायगर आपल्या कारमधून हॉटेलजवळ पोहोचला तेव्हा गर्दी पाहून बाहेरच पडला नाही. त्याने तेथून काढता पाय घेतला. दिशाला एकटे टाकून टायगर निघून गेला. काही वेळानंतर दिशा देखील हॉटेलमधून बाहेर आली आणि रिक्षातून निघून गेली.
हॉटेलमधून बाहेर येतेवेळी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती. टायगरने असं का केलं? याचं कारण काही कळू शकले नाही. दरम्यान, याआधी दोघे पॅरिसला जात असताना विमानतळावर पोहोचल्यानंतर टायगरने कारमधून बाहेर येणे टाळले होते. त्याआधीही दिशाच विमानतळावर पोहोचली होती. पळ काढणारा टायगर पुन्हा अर्ध्यातासाच्या अंतराने विमानतळावर दाखल झाला होता.